Wednesday, 2 July 2025

माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा....

माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा....

*** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) लावण्याची मागणी
मुरबाड, प्रतिनिधी - माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास हा अतिशय जिवघेणा असून, पावसाळ्यात तर धुके व‌ पावसामुळे दरीच्या बाजूचे संरक्षक भिंत व कठडे दिसत नाही त्यामुळे गाडी रस्त्याच्या अंदाजावर चालवावी लागते अन्यथा नागरीकांना नाहक जीव गमवावा लागेल त्यासाठी घाटातील दरीच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंती व कठडे यांवर रिफ्लेक्टर (परावर्तक ) लावण्यात यावे अशी मागणी आम्ही नगरकर मुंबई संघ वतीने राष्ट्रीय महामार्ग विभाग (NHAI)कडे करण्यात आली असून यावर त्वरित कार्यवाही करावी अथवा नाहक मनूष्यहानी ची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती आम्ही नगरकर प्रतिष्ठान कार्य अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...