Wednesday, 2 July 2025

राष्ट्रीय कर्मचारी सेना प्रणित शिवशंभू माथाडी व जनरल कामगार युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेना प्रणित शिवशंभू माथाडी व जनरल कामगार युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न !!

** युनियनचे अध्यक्ष सुनील पाटील,सरचिटणीस दीपक भालेराव यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
 
             राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मान. श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव प्रवक्ते, मा. आमदार श्री.किरण पावसकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय कर्मचारी सेना प्रणित शिवशंभू माथाडी व जनरल कामगार युनियनची सर्वसाधारण सभा गुरुवारी स्वर्गीय आनंद करू पाटील सभागृह शिंपोली येथे संपन्न झाली.
            या सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिव शंभू माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष श्री. सुनील पाटील आणि सरचिटणीस श्री. दीपक भालेराव यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवशंभू माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष श्री. सुनील पाटील, सरचिटणीस श्री. दीपक भालेकर व महिला विधानसभा समन्वय सौ. वंदना नार्वेकर उपस्थित होत्या. शेवटी शाखाप्रमुख श्री.नवनाथ बच्चे यांनी सर्वांचे आभार मानले व सभेची सांगता केली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...