Tuesday, 28 December 2021

अनेक वर्षे रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला - 'प्रभागातील नागरिकांकडून' माजी नगरसेवकांचा सन्मान

अनेक वर्षे रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला
- 'प्रभागातील नागरिकांकडून' माजी नगरसेवकांचा सन्मान


कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण पूर्व प्र.क्र. ९६ मधील साई टॉवर्स नामक सोसायटीच्या एका इमारतीच्या रहिवाश्यांना गेली सहा वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र हा प्रश्न स्थानिक माजी नगरसेवक रमेश सुदाम जाधव यांना कळविल्यानंतर रहिवाशांचा प्रश्न मार्गी लागला. या मुळे आनंदित झालल्या रहिवाश्यांनी माजी नगरसेवक रमेश सुदाम जाधव आणि त्यांच्या पत्नी रेखा जाधव यांचा जाहीर सत्कार केला.


 प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक हा कटिबद्ध असतो. क.डों.म.पा. क्षेत्रातील प्र.क्र. ९६ जाईबाई साईनगर प्रभागातील साई टॉवरच्या दुसऱ्या इमारतीत बिल्डरकडून पाण्याची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. मागील सहा वर्षे येथील रहिवासी पाण्यासाठी वणवण करीत होते. घरी एखादा पाहूणा जरी आला तरी मोठा प्रश्न रहिवाशांना पडत होता. त्यामुळे पालिकेचा कर भरूनही पाण्याचा रोजचा प्रश्न बाहेरून सोडवावा लागत होता. बिल्डर कडून सहकार्य मिळने जवळपास धूसर वाटू लागले होते. 


यामुळे इमारतीतील रहिवाशी माजी महापौर असलेले प्रभागाचे स्थानिक माजी नगरसेवक रमेश सुदाम जाधव यांच्या भेटीस आले. त्यांनी संबंधित समस्या रमेश जाधव आणि रेखा जाधव यांना कळवली. यावर तोडगा काढू असा शब्द रमेश जाधव यांनी रहिवाशांना दिला होता. त्यामुळे पुढील काही काळातच दिलेल्या शब्दा नुसार जाधव यांनी पाठपुरावा करून तात्काळ नवी पाईपलाईन इमारतीला पोहोचवली आणि सहा वर्षांनी घरोघरी नळाला पाणी आले.


पाण्याने सुखवलेल्या रहिवाशांची वणवण मिटल्याने त्यांनी रमेश जाधव आणि त्यांच्या पत्नी रेखा जाधव यांचा सत्कार केला. त्याचबरोबर शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद परब, उप शाखा प्रमुख राम पावशे, महिला शाखा संघटक कांचन हुमने, चंद्रकांत पालव, दत्ता पाखरे, मनोहर राणे, सखाराम भोसले व इतर सहकाऱ्यांचा देखील सन्मान केला. या प्रसंगी अजय गमरे, प्रमोद गुड्डू परब, अशोक पाखरे, प्रमोद ओव्हाळ, सचिन आळंगे, विजय आळंगे, नंदकुमार भोसले व सोसायटीतील इतर रहिवासी देखील उपस्थित होते.


प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी पुढे असतो असे रमेश जाधव यांनी सांगितले तर भविष्यात आम्ही देखील रमेश जाधव यांच्या पाठीशी उभे राहू असे इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...