Tuesday 28 December 2021

हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींना घेतले शिताफीने ताब्यात.!! "कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी"

हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींना घेतले शिताफीने ताब्यात.!!  "कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी"


कल्याण, हेमंत रोकडे : हरीयाणा राज्य, जिल्हा नुह येथील सिटी तावडु पोलीस स्टेशनचे ASI जसविर सिंग यांनी वपोनि. अशोक होनमाने यांना फोनद्वारे कळविले की, हरीयाणा राज्य येथुन २ अल्पवयीन मुली वय १५ वर्षे व १८ वर्षे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असुन त्याबाबत सीटी तावडु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुली कल्याण येथे आल्याची माहीती मिळुन आली असुन तपास पथकाला कल्याण येथे पोहचण्यास वेळ लागणार आहे. तरी अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घ्यावे, अशी विनंती केली होती.


अपहरण झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन वपोनि अशोक होनमाने यांनी सदरची माहीती मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ३, सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांना कळवुन अपहरण झालेल्या मुलींचा कल्याण परीसरात शोध घेणे कामी तात्काळ महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे दिपक सरोदे, भालेराव, तिडके यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून पाठविले होते. त्या प्रमाणे सदर पथकाने आपले सर्व कसब पणाला लावुन अतिशय दक्ष व चाणाक्षपणे कल्याण रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड परीसर, मार्केट परीसरात अपहरण झालेल्या मुलींचा मिळालेल्या वर्णनांचे आधारे कसोशीने शोध घेतला असता अपहरण झालेल्या मुलींच्या वर्णनाप्रमाणे २ अल्पवयीन मुली लक्ष्मी भाजीमार्केट गेटसमोर भांबावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्या हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या मुली असल्याचे निष्पन्न झाले आहे. हरीयाणा राज्य, सिटी तावडु पोलीस स्टेशनचे ASI जसविर सिंग हे महिला पोलीस अंमलदार व पोलीस पथकासह पोलीस ठाण्यात आले. ASI जसविर सिंग यांचेकडील कागदपत्रांप्रमाणे पडताळणी केली असता ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही अल्पवयीन मुली अपहरण झालेल्या मुलीच असल्याची खात्री झाली आहे. कायदेशिर कारवाईने दोन्ही अल्पवयीन • मुलींना सिटी तावडु पोलीस स्टेशनचे ASI जसविर सिंग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


अशा रितीने हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुली कल्याण परीसरात असल्याची माहीती मिळाल्यावरुन मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण श्री दत्तात्रय कराळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांचे देखरेखीखाली महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे डिटेक्शन पथकाचे दिपक सरोदे, पोहवा  भालेराव, तिडके यांनी सदर मुलींचा कसोशिने शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींबाबत माहीती मिळाल्यापासुन २ तासांचे आत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींना ताब्यात घेवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...