Tuesday 28 July 2020

बकरी ईद ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात येईल !!

बकरी ईद ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात येईल !!


मुंबई : बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. लॉकडाउनमध्ये कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणाले नवाब मलिक?

“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण येणार नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाइन बुक केली असेल त्यांनाही बकरी मिळेल”

बाळासाहेब थोरात यांनीही या संदर्भात भाष्य केलं आहे. सरकारने बकरी ईद संदर्भात काही सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यात येईल. नागरिकांनी नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...