Monday, 27 July 2020

*कळंबोलीतील स्टील मार्केट बनले नियमबाह्य कामाचे आणि भ्रष्टचाराचे आगर....!*

*कळंबोलीतील स्टील मार्केट बनले नियमबाह्य कामाचे आणि भ्रष्टचाराचे आगर....!*


पनवेल (अण्णा पंडित) कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार (स्टील मार्केट) हे नियमबाह्य कामाचे आणि भ्रष्टचाराचे आगर बनले असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीने घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये अनियमिता आणि भ्रष्टचार झाल्याचे माहिती अधिकारात दिसून आले आहे. मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीच्या आवारात सद्य स्थितीत भूखंडाबाबत सर्वेक्षण अहवालानुसार १९४७ भूखंड धारकांपैकी ६११ भूखंड धारक लोखंड व पोलाद व्यक्तिरिक्त अनधिकृत व बेकायदेशीर वापर व व्यवसाय करत आहेत, तसेच मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीने कळंबोली अंतर्गत येथील आवारातील वेगवेगळ्या प्लॉटवरील सर्व एकाच प्रकारची कामे करण्यासाठी ई-निविदाचा वापर न करता तुकडे पाडून ठेकदारला फायदा होईल अशा प्रकारे कामे देण्यात आल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाने निदर्शनास आणून दिले आहे.


सन २०१७ -२०१८ मध्ये १७ लाख ५१ हजार ९६३ रुपये किमतीचे मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीने सी.सी.टी.व्ही, फोन टॅब आणि सी.सी.टी.व्ही. सोफ्टवेअर हे साहित्य नव्याने घेतले होते, परंतु याबाबत कोणताही लेखा जडसंग्रह नोंदवहीत घेण्यात आलेला नाही. म्हणून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे लेखा परीक्षण अहवालानुसार मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समिती अधिनियम ४२ प्रमाणे संस्थेचे लेखा परीक्षण मुख्य लेखापरीक्षक, महाराष्ट्र स्थानिक निधि लेखापरीक्षा यांच्याकडून करण्यात यावे असे नमूद असताना देखील, मे.अग्निहोत्री अँड असोसीएट यांची नेमणूक करून बाजार समितीच्या खर्चात वाढ केल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीच्या अनेक निर्णयात ठेकेदाराच्या लाभात ठेकेदारा सोबत संगनमत करून घेतल्याचे दिसत आहे, ज्यामुळे महाराष्ट्र स्थानिक निधि लेखापरीक्षा विभागाने ताशेरे ओढले असून त्यावर अद्याप कारवाई न केल्याने या संदर्भात एमएमआरडीए आयुक्त आणि नगर विकास सचिव यांच्याकडे लेखी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर नियमबाह्य काम करून भ्रष्टाचार  करण्यात आला आहे त्या अधिकार्‍यांचे निलंबन करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली असुन सदर निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गवस यांची स्वाक्षरी असल्याची माहिती सुनील शिरिषकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम... मुरबाड- (योगेश्वरी मणी)  येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...