Friday, 31 July 2020

डाॅ.अजय मोरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती व्हावी या मागणीसाठी स्वराज्य चित्रपट संघटनेसह राज्यभरातून विविध क्षेत्रातील संस्थांचा जाहीर पाठिंबा ..!

डाॅ.अजय मोरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती व्हावी या मागणीसाठी स्वराज्य चित्रपट संघटनेसह राज्यभरातून विविध क्षेत्रातील संस्थांचा जाहीर पाठिंबा ..!
    
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध अष्टविनायक कला अकॅडमिचे संस्थापक तथा विविध क्षेत्रांतील जाणकार असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉ. अजय मोरे यांना विधान परिषदेवर आमदार करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्र मधून अनेक चित्रपट संघटना, सामाजिक संघटना , प्रोडक्शन , कलाकार , यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर लवकरच विविध क्षेत्रातून १२ विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यातील एक जागा हि कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आहे .        
      कलाकारांच्या हक्काचा माणूस म्हणून डॉ अजय मोरे यांच्याकडे पाहिलं जात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट नाट्य क्षेत्रातील कलाकार, पडद्यामागील कलाकार , तंत्रज्ञ यांच्या साठी डॉ अजय मोरे निस्वार्थ हेतूने निरंतर काम करत आहेत,अष्टविनायक कला अकॅडमीच्या माध्यमातून अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अजय मोरे यांनी केले आहे, ते स्वतः अभिनेते, लेखक , दिग्दर्शक, निर्माता आहेत, कलाकारांचे प्रश्न वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू असते, त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अनेक संस्था संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत, स्वराज्य चित्रपट संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख म्हणूनही ते काम करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात कलावंत तसेच पडद्यामागील काम करणारे तंत्रज्ञ् यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती त्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी कलाकारांना धान्य किट तसेच जेवणाची व्यवस्था केली. 
     तसेच सर्व कलावंताचे प्रश्न घेऊन योग्य रीतीने प्रभावी पद्धतीने शासन दरबारी मांडून कलावंतांच्या बाजूने त्यांचा न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी डॉ.अजय आत्माराम मोरे गेल्या अनेक वर्षांपासून कला सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे व आपल्या हक्काचा कलाकार आपले प्रश्न मांडण्यासाठी  राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र भरातून अनेकांनी मागणी केली आहे तसेच अनेकांचा व्यक्तिगत पातळीवर पाठिंबा मिळत आहे.
    कला व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्नाची जाण असणाऱ्या व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव झटणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता डॉ.अजय आत्माराम  मोरे यांना  विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केल्यास नक्कीच सर्व कलाकारांचे प्रश्न मार्गी लागतील ,आज कला क्षेत्रातील सदस्य पदावर कला व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती घेतल्यास नक्कीच चित्रपट व नाट्य क्षेत्राला याचा फायदाच होईल असे स्वराज्य चित्रपट संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश यादव यांच्या सह विविध सामाजिक धार्मिक संघटना आणि अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांचे ठाम मत आहे.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...