Saturday 1 August 2020

सानिकाने संस्कृत या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून वडीलांना वाहिली श्रधांजली !!

सानिकाने संस्कृत या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून वडीलांना वाहिली श्रधांजली !!


 यवतमाळ : "सानिका" या भटक्याविमुक्त समुदायातील वडार समाजाच्या मुलीने जन्मदात्याचा मृतदेहाला झाकुन ठेवुन 10 वीच्या संस्कृत या किचकट विषयाचा भरलेल्या आश्रुनयनांनी पेपर दिला...
     आणि त्या पेपरला 100 पैकी 100 गुण मिळवून वडीलांना खरी श्रद्धांजली वाहिली......
   ही सत्य कहाणी घडली आहे. मु.पो.हिवरा ता.जि.यवतमाळ येथील  वडार समाजाचे कार्यकर्ते कै.सुधाकर गोविंदराव पवार यांची कन्या सानिका सुधाकर पवार... 
     अतिशय कठीण  प्रसंगी संयम आणी मन विचलित न होवुन देता तीने ही किमया साधली आहे, हि अतीशय कौतुकास्पद बाब आहे. एवढच नव्हे तर तीने 10 वीच्या एकुण 500 गुणा पैकी 488 गुण म्हणजे  97.60 % गुण मिळवून बोडाँत मिरीट मधे येण्याचा मान देखील मिळविलेला आहे. 
     आपल्याला माहीत आहे कोरोनाच्या पाश्वभुमीवर या वषीँची 10 वीची परिक्षा अतिशय दडपणाखाली पार पडली. सानिकाच्या बाबतीत मात्र कोरोना बरोबरच स्वताच्या जन्मदात्याचा संस्कृत या विषयाच्या पेपरच्या दिवसीच मृत्यू झाला... 
     सकाळी मृतदेह घरी आणला परंतु पेपरची वेळ आणी मृतदेह घरी आणल्याची वेळ एकच झाली... तेव्हा सानिकाने वडीलांच्या मृतदेहाचे दर्शन घेवुन पेपरला जाण्याचा निर्णय घेतला.. आणी ती पेपर सोडवून आल्याच्या नंतर अंत्यविधी पार पडला...
     या प्रसंगातही दिलेल्या पेपरला ते हि संस्कृत या लोप पावत चाललेल्या विषयात तीने 100 पैकी 100 मिळवले.... 
याची दखल महाराष्ट्रचे मुख्यमंत्री ना.ऊध्व ठाकरे साहेबांनी फोन करुन अभिनंदन केलेले आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्या कडून महाराष्ट्र सरकारच्या वतीने तीचा उच्चतम सन्मान दिला..

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...