Saturday, 1 August 2020

ठाणे जि.प.च्या समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची बिनविरोध निवड !!

ठाणे जि.प.च्या समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची बिनविरोध निवड !!


मुरबाड (मंगल डोंगरे ) नुकताच ठाणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत चार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली.त्यात मुरबाडच्या नंदा उघडा यांची समाज कल्याण समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीने मुरबाड तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
           मागील जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत नंदा उघडा ह्या वैशाखरे जिल्हा परिषद गटातुन मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत.त्यांच्या या निवडीमुळे मुरबाड तालुक्यातील गोरगरीबांची समाज कल्याण खात्यातुन होणारी कामे आता अजून जलदगतीने होण्यास मदत होईल. अशी अपेक्षा मुरबाड करांना लागुन राहिली आहे.

No comments:

Post a Comment

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !! म...