Saturday, 1 August 2020

आमदार यामिनी जाधव यांनी घेतला जेजे रुग्णालयाच्या स्थितीचा आढावा !!

आमदार यामिनी जाधव यांनी घेतला जेजे रुग्णालयाच्या स्थितीचा आढावा !!


*रिक्त पदांसंदर्भात नवा कृती आराखडा बनविण्याची सूचना* 

मुंबई, विष्णु गुप्ता : भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय *आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव* यांनी शुक्रवारी (दिनांक ३१ जुलै, २०२०) सर जे जे समूह रुग्णालयाच्या स्थितीचा आढावा घेतला. सद्यस्थिती आणि भविष्यकाळासाठी नियोजन यावर आ. जाधव यांनी अधिष्ठाता रणजीत माणकेश्वर यांच्याशी चर्चा केली. रिक्त पदांसंदर्भात नवा कृती आराखडा बनविण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. यावेळी जेजे बरोबरच जीटी आणि सेंट जॉर्जचे वैद्यकीय अधीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.  

जे जे रुग्णालय हे मुंबई शहराच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालय असून नॉन कोव्हीड रुग्णालय आहे. मात्र सध्या कोव्हीड रुग्णांना देखील या रुग्णालयात दाखल केले जात आहे. आमदार जाधव यांनी जे जे रुग्णालयात भेट देऊन कोव्हीड वॉर्ड, नॉन कोव्हीड वॉर्डची माहिती घेतली. कोरोनावर प्रभावी ठरणारी प्लाझ्मा थेरपी सेंटर जे जे रुग्णालयात आहे त्यासंदर्भात आ. जाधव यांनी माहिती घेतली. भविष्यासाठी रुग्णालयाने काय नियोजन केले आहे, रुग्णसंख्या किती आहे आणि त्यांना योग्य सुविधा मिळत आहेत का, याचा आढावा घेण्यात आला. 

सर जेजे रुग्णालयात मध्यंतरी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न भेडसावत होता. मात्र अलीकडे काही रिक्त पदे भरण्यात आली असली तरी इतर कार्यालयीन पदे अद्यापही रिक्त आहेत. पूर्वी परिचारिकांची संख्या ८०० होती, ती आता १२०० झाली आहे. मात्र क्लार्कची संख्या अजूनही तीच आहे, अशी माहिती आ. जाधव यांना देण्यात आली.  त्यामुळे नवा कृती आराखडा बनविण्याची सूचना आ. जाधव यांनी संबंधितांना केली. डॉक्टर्स, सफाई कर्मचारी, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी तसेच वारसाहक्क जागेवर नेमणुका याबाबत त्यांच्या समस्या आ. जाधव यांनी जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या समस्यांसंदर्भात प्रशासनाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी शरीरशास्त्र विभाग प्रमुख सचिन मुकुलवार, जेजे चे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय सुरासे, जीटी रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. चिखलकर, आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. खोब्रागडे, प्रशासकीय अधिकारी पठाण मॅडम, सोनावणे, सुनील चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी अरुण राठोड, कानविंदे, दिलीप गवारी त्याप्रमाणे शिवसेना पदाधिकारी विजय (दाऊ) लिपारे, राम सावंत, हेमंत मयेकर, कृष्णा रेणोसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संकल्प जनहित समितीच्या वतीने गुढे कोंडवी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप !!

संकल्प जनहित समितीच्या वतीने गुढे कोंडवी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप !! प्रतिनिधी - निलेश कोकमकर  चिपळूण (वार्ताहर) : तालुक्याती...