महसूल दिनाच्या माध्यमातून संपूर्ण रायगडकरांना झाले जिल्हाधिकारी निधी चौधरींच्या आदर्श कृतीशीलतेचे दर्शन !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) महसूल दिनाचे औचित्य साधून तसेच नुकतेच निधन झालेले रोहा तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार संजय नागावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रायगड जिल्ह्याच्या कृतीशील, कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य तत्पर जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अलिबाग उपविभागीय अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते.
मात्र या शिबिराचे वैशिष्ट थोडेसे आगळेवेगळे होते, ते म्हणजे रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांची ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे. कराेना चे संकट, त्यात निसर्ग चक्रीवादळाने केलेली वाताहत या सर्वच आघाड्यांवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी धडाडीने काम करीत आपल्या कार्य तत्परतेची आणि कुशल नेतृत्वाची क्षमता आधीच सिद्ध केली आहे. मात्र आजच्या महसूल दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सर्वप्रथम स्वतःच रक्तदान करून जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी "Leaders Speaks With Action" & Action speak louder than words या इंग्रजी विधानाचा संपूर्ण रायगड जिल्ह्याला आणि जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला प्रत्यय आणून दिला.
या निमित्ताने कराेना विरुद्धच्या युद्धात उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांचाही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, प्रांताधिकारी शारदा पाेवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, तहसिलदार सचिन शेजाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment