Saturday, 1 August 2020

मनसेच्या निवेदनाची दखल न घेतल्याने ,नगर पंचायत विरोधात मनसे करणार आंदोलन .!!

मनसेच्या निवेदनाची दखल न घेतल्याने ,नगर पंचायत विरोधात मनसे करणार आंदोलन .!!


मुरबाड (मंगल डोंगरे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरबाड नगर पंचायत ला निवेदन देवून पंधरा दिवसांचा काळावधी दिला होता.मात्र 15 दिवसांचा काळावधी पुर्ण झाला असतानाही नगर पंचायत. प्रशासनाने मनसेच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने मुरबाड  शहर मनसेच्या वतीने 5 आँगस्ट 2020 रोजी मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे मनसे मुरबाड  शहर उपाध्यक्ष सागर भंडारी यांनी नगर पंचायत ला दिलेल्या निवदनात म्हटले आहे.
         मुरबाड नगर पंचायत स्थापन झाल्या पासुन नगर पंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. जसे रस्ते,पाणी,लाईट,व्यावसायिक गाळे,प्रशासकीय इमारती,असे एक ना अनेक उपक्रम सुरु आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यापैकी दुर्लक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 12 मधील उगळे आळी ते माळी नगर जाणारा रस्ता आहे.ज्या रस्त्याचे काम अनेक वर्षे झाले नाही. आणि आत्ता ची परिस्थिती तर या रस्त्यावरुन ना धड पायी चालता येत नाही. ना कुठले वाहन चालवता येत.अशातच या रस्त्यावरुन शालेय विद्यार्थी,एम.आय.डी.सी.त जाणारे कामगार वर्ग,जेष्ठ नागरिक आजारी रुगण यांना जाता येताना खुपच त्रास होतो.सदर बाब मनसेचे मुरबाड. शहर उपाध्यक्ष सागरी भंडारी यांनी कायदेशीर रित्या एका निवेदनाद्वारे मुरबाड. नगर पंचायत प्रशासनाला कळविली होती. त्यात या रस्त्यावरील खड्डे हे तात्पुरत्या स्वरूपात भरून हा रस्ता माणसाना चालण्यास योग्य असा करण्यात यावा.म्हणून विनंती केली होती.मात्र नगर पंचायत प्रशासने हेतु पुरस्पर पणे मनसेच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप करून , आम्ही दिलेली मुदत संपत आली तरीही दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आमच्या स्टाईलने 5 आँगस्ट रोजी नगर पंचायत प्रशासना विरोधात आंदोलन करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !!

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  !!  **पाण्याच्या  पातळीत वाढ होत असताना कोणीही  नदी ओलांडू नये, किंवा अशा मार्गाने प्रवास करु नय...