Tuesday, 28 July 2020

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुरबाडमध्ये शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध!

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुरबाडमध्ये  शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर  निषेध!   


  * जय श्रीराम नामाची २०००  पत्रे मुरबाडमधून शरद पवारांना पाठविली  *   


मुरबाड {   मंगल डोंगरे } राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट  रोजी होणाऱ्या अयोध्येतील संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर " मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही "  या  रामनामावर केलेल्या वक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशाने , भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल  पाटील व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण, मुरबाड तालुका व मुरबाड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने डाकघर मुरबाड कार्यालया जवळ  जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला . ५ ऑगस्टला संपूर्ण दिवसभर शरद पवारांनी श्रीराम नामाचे महत्व जाणावे, तमाम रामभक्तांच्या अपार भक्तीला पोहचलेली ठेच त्यांच्या लक्षात यावी व त्यांनी त्या दिवशी संपूर्ण दिवसभर रामनामाचा जप करावा यासाठी भाजपा युवा मोर्चा, ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने यावेळी २०००  श्रीराम नामाची पत्रे पाठविण्यात आली . यावेळी उपस्थित सर्व  कार्यकर्त्यानी  जय श्रीराम , जय श्रीराम असा जयघोष करून संपूर्ण मुरबाड शहरात श्रीराममय वातावरण निर्माण केले होते . यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा मुरबाड शहर अध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, नगराध्यक्षा छाया चौधरी, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, माजी नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, जयवंत कराळे सर,  माजी नगरसेवक मोहन दुगाडे, तुषार जोशी,  संतोष चौधरी आदी  उपस्थित होते.  या निषेध कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस जयवंत हरड,  उपाध्यक्ष , युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण निलेश पष्टे,   युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हरेश खापरे, मुरबाड शहर अध्यक्ष मुकेश विशे, जगदीश पष्टे, सागर कार्ले, गणेश गोंधळे, अरुण गायकर , निलेश गायकर यांनी केले होते .

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...