Tuesday 28 July 2020

कल्याण मुरबाड महामार्गाला जोडणारा मोहिली मोहने पुलावर चोरटय़ांचा डल्ला, सरक्षक लोखंडी पाईप गायब!

कल्याण मुरबाड महामार्गाला जोडणारा मोहिली मोहने पुलावर चोरटय़ांचा डल्ला, सरक्षक लोखंडी पाईप गायब!


कल्याण (संजय कांबळे) शहापूर टिटवाळा या परिसरातील वाहने कल्याण मुरबाड महामार्गावर येण्यासाठी तसेच कल्याण, कर्जत तालुक्यातील वाहनांना नाशिक हायवेवर सहज जाता यावे यासाठी कित्येक कोटी रुपये खर्च करून मोहने मोहिली-पावशेपाडा कांबा हा पुल उल्हास नदीवर बांधला खरा परंतु तो वाहतूकीसाठी सुरु होण्या अगोदर या पुलाच्या संरक्षक लोखंडी पाईप चोरटय़ांनी काढून धुम ठोकली त्यामुळे आता हा पुल धोकादायक झाला आहे.



टिटवाळा, शहापूर, पडघा, भिवंडी या परिसरातील वाहने नागरीकांना कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर कर्जत, मुरबाड या शहरात ये जा करने सहज व सोपे व्हावे यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखरेखीखाली मोहने - मोहिली ते  पावशेपाडा कांबा असा उल्हास नदीवर दोन ते तीन वर्षांपुर्वी पुल बांधण्यात आला आहे. दत्त कन्स्ट्रक्शन यांनी याचा कामाचा ठेका घेतला असून सुमारे ५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. नदीच्या दोन्ही तिरांना जोडेल इतके काम पूर्ण झाले आहे. परंतू कांबा पावशेपाडा बाजुकडिल एका जागा मालकाने यास विरोध केला आहे. अगदीच कोर्टात केसेस केल्या आहेत. त्यामुळे पुढील काम थांबले आहे.
पुलाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पुलावर संरक्षक खांब उभे करून त्याला लोखंडी पाईप लावण्यात आले होते. परंतू चोरटय़ांनी यावर डल्ला मारला असलेचे दिसून येते. दोन्ही बाजूच्या पाईपा काढून नेल्या आहेत. तर ज्या निघाल्या नाही. त्या वाकवल्याचे दिसत आहे हा सर्व प्रकार लाॅकडाऊण च्या काळात केला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हा पुल वाहतूकीसाठी चालू झाला तर म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते मोहने, अंबिवली, बल्याणी, उंबार्णी, मानवली, घोटसई, वासुद्री, खडवली टिटवाळा आदी गावातील नांगरिकाना ये जा करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरला असता. यामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय होणार नव्हता. सध्या या पुलाची दुरावस्था पाहून हा लवकर सुरू होईल असे मुळीच वाटत नाही. कारण उदाशीण प्रशासन आणि मजबूत तक्रारदार यामुळे मोहने मोहिली पावशेपाडा कांबा हा कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पुल हा या परिसरातील दिवा स्वप्न ठरू नये हीच अपेक्षा! 

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...