Thursday 30 July 2020

कल्याण पंचायत समिती कोणासाठी? घोटसई येथील शेतकर्‍यांचा संतप्त सवाल, गैरसोयीचा कळस!

कल्याण पंचायत समिती कोणासाठी? घोटसई येथील शेतकर्‍यांचा संतप्त सवाल, गैरसोयीचा कळस!


कल्याण (संजय कांबळे) पंचायतराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कल्याण पंचायत समितीवर खरेच लोकांचे राज्य आहे का असा प्रश्न उपस्थित  करण्यामागे कारण देखील तेवढेच गंभीर आहे. घोटसई येथील बळीराजाने चक्क पंचायत समिती कोणासाठी? असा प्रश्न त्यांना आलेल्या अनुभवावरून उपस्थित केला आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की कल्याण तालुक्यातील घोटसई गावातील प्रगतीशील शेतकरी जयवंत किसन मगर यांची अनखरपाडा येथील पेट्रोल पंपाच्या मागे सुमारे दोन एकर च्या आसपास शेतजमीन आहे.


गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळावा नाही. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. परंतु लाॅकडाऊण मुळे परिस्थिती गंभीर असतानाही कशीतरी भात पेरणी केली. पिकही चांगले आले. पण पावसाने उघडिप दिल्याने चिंता वाढली. त्यातच त्यांना युरिया खते व इतर औषधे मिळेनात. यांची तक्रार करण्यासाठी व शेतकऱ्यांना कोणत्या योजना आहेत. काही सवलती आहे का हे विचारण्यासाठी ते सकाळी १२ते १च्या दरम्यान कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयात गेले होते. मात्र तेथे गेले तर कार्यालय बंद,
या बाबतीत मगर यांनी चौकशी केली तर कल्याण पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याचे समजले. ही बैठक किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही असे ही त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे बसायचे कोठे? पिण्याचे पाणी कोठे आहे. लघुशंकेसाठी कोठे जायचे यांची माहीती घेतल्यावर मात्र त्यांचा संताप अनावर झाला. त्यामुळे ही पंचायत समिती आहे का? ही फक्त पदाधिकाऱ्यांसाठी आहे का असा प्रश्न उपस्थित केला. येथे सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना काय जागा आहे की नाही. असा उध्विघ्न सवाल करून ते निघून गेले.
तसे पाहिले तर कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहसा ग्रामीण भागातील लोक कल्याण ला येत नाहीत. परंतु कधीतरी वर्षे, सहामहिन्यातून एकदा येणाऱ्या बळीराजाची पंचायतराज व्यवस्थेबाबत असे मत असेल तर ते नक्कीच भूषणावह नाही. 
सध्या कल्याण पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे असे सेनेचे पदाधिकारी सांगतात. तसे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. परंतु स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की 20टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण सेना करते. पण तसे कल्याण पंचायत समितीच्या परिसरात वातावरण आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. नागरिकांना ग्रामपंचायतीकडून न्याय नाही मिळाला तर ते पंचायत समितीला खेटे मारतात. पण तेथेही असे प्रकार होणार असल्यास तालुक्यात पंचायतराज आहे का असा प्रश्न विचारला जातोय. का केवळ ठेकेदारासाठी व कामे मिळविण्यासाठी कल्याण पंचायत समितीचा वापर केला जातो अशी शंका मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. 

प्रतिक्रिया "मी कित्येक वर्षे कल्याण पंचायत समिती मध्ये पाय ठेवला नाही, अद्याप पर्यंत कृषी विभागाची एक  योजना आमच्या कडे आली नाही. परंतु आता खते, कीटकनाशके किंवा इतर काही शेतकऱ्यांसाठी आहे का याची माहिती घेण्यासाठी कृषी विभागात आलो होतो पण ते बंद होते" - जयवंत मगर, शेतकरी घोटसई. 
" असे घडणार नाही पण तसे झाले असेल तर मी ताबडतोब या बाबतीत संबंधितांना विचारतो "-रमेश बांगर, उपसभापती, कल्याण प स, 
 

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...