Thursday 30 July 2020

स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी घेतली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांच्या पत्राची दखल !

स्वाभीमानी पक्षाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी घेतली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांच्या पत्राची दखल !


उल्हासनगर : प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील व सचिव सुनील शिरीषकर, तसेच कार्यकर्ते यांनी २० जुलै २०२० रोजी पालिका आयुक्तांना निवेदन दिले व उल्हासनगर महानगर पालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य सुविधांची कमतरता होत असून त्याचा फटका पालिकेच्या हद्दीतील सर्व सामान्य रुग्णांना जाणवत आहे, म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगर पालिकेने ज्या प्रकारे वाशी रेल्वे स्टेशनच्या येथील सिडको प्रदर्शन सेंटर ताब्यात घेतले, त्याच धर्तीवर उल्हासनगर पालिकेने ५०० बेडचे नवीन कोविड सेंटर उभारणी करावे.

१. प्रत्येक खाजगी रुग्णालयाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले रिकाम्या बेडची माहिती रोजच्या रोज दर्शनी भागात लावणे बंधनकारक असावे.

२.राज्य सरकारने कोविड उपचार करण्यासाठी ठरवून दिलेले दर रूग्णांच्या महितीकरिता उपलब्ध करून देणे.

३.मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयाने डिपॉजिटच्या नावाखाली रक्कम जमा करण्यास सांगून लोकांची आर्थिक लूट करत आहे त्याला पायबंद करण्यात यावा व संबधित रुग्णालयावर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

४.अनेक ठिकाणी रुग्ण पॉजिटिव सापडत असताना ज्या प्रकारे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयीत व्यक्तीचे ट्रेसिंग झाले पाहिजे तसे होताना दिसत नाही, म्हणून संबधित अधिकाऱ्यांना सूचना देवून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्वी प्रमाणे करणाचे आदेश द्यावेत.

५.पालिकेच्या हद्दीतील रुग्णांना कोविड व्यतिरिक्त आजारासाठी तत्काळ बेड उपलब्ध करून देणे.

६.महात्मा फुले जनआरोग्य योजनेची कडक अंमलबजावणी करून गरजू आणि गरीब लोकांना त्यांचा फायदा देण्यात यावा.

७.बेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.

८.उल्हासनगरातील साई प्लॅटिनम हाॅस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून वगळावं. तिथे आजवर केलेल्या कोविड उपचारांचं वत्यांनी दिलेल्या आजवर पर्यंतच्या बिलाचे लेखा परीक्षण व्हावे .

९.वैद्यकीय आस्थापना अधिनियम तातडीने लागू करावा. उपचारांवरील खर्चाचं नियमन करावे .

या मागण्या रास्त व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेच्या असल्याने ‌त्याची तातडीने दखल घेऊन स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी आयुक्त, उल्हासनगर महानगर पालिका यांना सदर अर्जावर अंमलबजावणी करण्यास सांगितले नाहीतर आंदोलन उभे केले जाईल असे म्हटले आहे.

ठाणे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील व सचिव सुनील शिरीषकर यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चु कडू यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्र्नांची नेहमीच दखल घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिल, तसेच आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांचे सुध्दा आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...