Thursday 30 July 2020

सोमवार दिनांक 27.07.2020 रोजी नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संस्थेच्या महिलांची नागरिकांच्या लाईट बिलाच्या तक्रारी संदर्भात MSEB ऑफिसला भेट.!

सोमवार दिनांक 27.07.2020 रोजी नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संस्थेच्या महिलांची नागरिकांच्या लाईट बिलाच्या तक्रारी संदर्भात MSEB ऑफिसला भेट.!


खेड ( प्रतिनिधी ) : -
लॉकडाऊन नंतरच्या काळात नागरिकांना भरमसाठ लाईट बिल आले आहे. मुळातच मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात मीटरचे रीडिंग झाले नसल्यामुळे आणि जून महिन्यात मीटरचे रीडिंग झाले आणि आता भल्या मोठ्या रकमेची बिले नागरिकांना येत आहेत. त्यामुळे खेड येथील नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः महिला वर्ग ..आणि संतप्त महिला वर्गाने नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनयझेशनच्या महिलांना संपर्क साधला. 
नागरिकांच्या या तक्रार निवारणार्थ या सर्व महिलांनी खेड MSEB office ला भेट देऊन नागरिकांना बिल कपात व्हावी असे निवेदन दिले तसेच नागरिकांनी तक्रार अर्ज दिला.
श्री.गावडे , श्री.झाडे आणि श्री. कुलकर्णी या सर्व शाखाधिकारी कडे चर्चा केली त्यातून समाधान पूर्वक माहिती मिळाली तसेच MSEB office मधून छान सहकार्य मिळाले 
मुळातच बिलात स्थिर आकार शुल्क Rs.100, वीज वाहन शुल्क , मीटर रीडिंग नुसार येणारी रक्कम आणि ह्या वरील सर्व रकमेवर येणारे 16%  शुल्क अश्या प्रकारे बिलची एकूण रक्कम नमूद केली जाते, उपरोक्त उपयोगी माहिती सर्व अधिकाऱ्यांकडून मिळाली 
तसेच 9.8.2020 या तारखेपर्यंत बिल भरल्यास 2% डिस्काउंट मिळणार आहे अन्यथा आपण हेच बिल 3 टप्प्यात म्हणजे जुलै महिन्यापासून येणाऱ्या तीन महिन्यात भरू शकतो, अशीदेखील सविस्तर माहिती सर्व पदाधिकारी महिलांना mseb ऑफिस मधून मिळाली.
तसेच दिनांक 1.4.2020 पासून प्रत्येक युनिट मध्ये दरवाढ झाली असून त्याबाबत ही या संस्थेच्या महिलांनी नाराजगी दर्शविली आहे.
नागरिकांना बिलात येणारे वीज वाहन शुल्क, आणि 16% वीज आकार शुल्क कमी करण्यात यावेत , यासाठी या संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांकडून ऊर्जा मंत्री आणि पालक मंत्र्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्यांच्याडून येणाऱ्या अपेक्षित बदलासाठी काही काळ वाट बघावी लागेल.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्षा सौ.सायलीताई कदम, सौ पूजा तलाठी. तालुका अध्यक्ष सौ.मीनल गांधी, शहर अधयक्ष दनिश्ता नाडकर , प्राची तोडणकर, प्रीती चिखले, रोशनी बाविस्कर आदी महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...