Thursday 30 July 2020

जि.प. प्रा. शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी सेमी इंग्लिश मधून 10 वी त प्रथम !!

*जि.प. प्रा. शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी  सेमी इंग्लिश मधून  10 वी त  प्रथम !!


मुरबाड (मंगल डोंगरे ) हल्ली समाजातील प्रत्येकाला जिवन जगायला सरकारी नोकरी,फिरायला सरकारी गाडी,राहायला सरकारी बंगला हवा असतो.मात्र सर्वकाही सरकारी सुविधांची अपेक्षा करणा-यांची मुलं सरकारी जिल्हा परिषद शाळेत शिकवायला नको असतात.त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खुद्द जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकच असतात. गोरगरीबांची मुलं ह्यांच्या देखरेखी खाली सरकारी शाळेत शिकवली जातात.पण याच शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमातून ,काँन्व्हेट मधून शिकली पाहिजेत. म्हणून याच शिक्षक मायबापाचा अट्टहास असतो.परंतु या शापित शब्दाना तिलांजळी देत,मुरबाड तालुक्यातील धानिवली गावचे शिक्षक असलेल्या नितीन दामोदर राणे या शिक्षकांने खरा इतिहास घडवला आहे.ते स्वतः जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक असुन त्यांनी  आपल्या शैक्षणिकतेची सत्वपरीक्षा स्वतःच घेण्याचे ठरविले.आणि आपण ज्या शाळेवर गोरगरीब,आदिवासींच्या मुलांना शिकवितो,त्याच शाळेत,त्याच विद्यार्थ्यां सोबत आपल्या लाडक्या मुलाला शिकविण्याचे ठरविले. आणि इयत्ता. पहिले ते 4 थी  पर्यंत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी  संख्या असलेल्या फणसोली कातकर वाडी येथे शाळेत घातले.तिथे 4 पर्यंत शिक्षण घेवून पुढे त्यानंतर हाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी इयत्ता पाचवीला मुरबाड च्या न्यु इंग्लीश स्कूल मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून शिकु लागला.आणि नुकताच हाती आलेल्या दहावीच्या निकाला मध्ये तो सेमी इंग्रजी माध्यमात घवघवीत यश मिळवून न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.या विद्यार्थ्यांचे नाव आहे ओमकार नितीन राणे,राहणार मुरबाड शेजारील धानिवली गावचा तो रहिवासी असुन त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे  सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
   ओमकार राणे ला इयत्ता दहावीत .92.60 ℅.....  गुण मिळाले आहेत.  त्याची शैक्षणिक वाटचाल हि,    जि. प .प्रा. शाळा फणसोली(कातकरीवाडी) येथुन झाली आहे.तिथे तो इ. 1ली ते 4थी पर्यंत शिकलेला विद्यार्थी कु. ओमकार नितीन राणे हा 10वी सेमी 92:60 % ने न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड मध्ये प्रथम आला.. 
विशेषतः आज इंग्लिश मिडीयम चं फॅड चालू आहे. बरेचशे शिक्षक हे खेडे पाड्यात राहणारे व आपल्या गावातील शाळेवर नोकरी करणारेच,पण त्यांच्या मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं म्हणून जिवाचा आटपिटा करत तालुक्याच्या किंवा आणखी मोठ्या शहरात स्थलांतर करतात.जर आपली मुलं आपण असलेल्या खेड्या पाड्यातील जि.प.मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाहीत. हि खात्री त्या जि.प.शिक्षक पालकांना नसेल, तर गोरगरीबांच्या,आदिवासींच्या मुलांना हे शिक्षक दर्जेदार शिक्षण देत असतील काय?हा प्रश्न निर्माण होतो.परंतु श्री नितीन दामोदर राणे व सौ अर्चना नितीन राणे ह्या शिक्षक दांपत्याने दोघे ही प्राथमिक शिक्षक असताना ... आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं..आणि  आज त्याच ओमकार ने चांगलं यश संपादन केलं आहे...हा आपल्या विद्यादानावर असलेला आपला विश्वास खरा ठरवला आहे.
      प्रत्येक शिक्षकाने आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल करायला हवं त्याने इतर पालकांचा ही मराठी शाळेकडे पाहण्याचा कल नक्कीच बदलेल... 
      हाच  आदर्श प्रत्येक शिक्षकाने घ्यावा.अशी अपेक्षा जि.प.प्राथमिक शिक्षक नितीन राणे गुरुजी व अर्चना राणे मँडम  यांनी आमचे मुरबाड तालुका  प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...