Monday 27 July 2020

कोव्हिड रुग्णांच्या भेटीसाठी शिवसेनेची मांदियाळी !!

कोव्हिड रुग्णांच्या भेटीसाठी शिवसेनेची मांदियाळी !!   


मुरबाड (मंगल डोंगरे )
मुरबाड तालुक्यात सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असुन,मागील काही दिवसां पासुन रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. याची दखल घेवुन राज्य हात माग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना ठाणे जिल्हा(ग्रा) प्रमुख प्रकाश पाटील व जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सुषमा लोने ,उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांसह जि.प.सदस्या रेखाताई कंटे यांनी  नुकताच मुरबाड मधील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेवुन पिपीई किट घालुन थेट कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेवुन संवाद साधत विचारपुस केली व रुग्णांच्या समस्या जाणुन घेतल्या.
       आता पर्यंत मुरबाड तालुक्यात 256 रुग्ण कोरोनाने बाधीत झाले असुन 65 रुग्ण उपचार घेत आहेत आहेत. या भेटीत त्यांनी येथील कोव्हिड सेंटरच्या  सोयीसुविधांची पाहणी करुन तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. तसेच रुग्णांचे म्हणणे ऐकून त्यांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टरांशी समन्वय करुन त्याच ठिकाणी त्यांच्या सुचनांचे निरसन केले. तसेच तिथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत आणि अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.या वेळी रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणुन च्यवनप्राश चे वाटप करण्यात आले. या भेटी दरम्यान जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, किसन गिरा, तालुका प्रमुख कांतीलाल कंठे,आप्पा घुडे,रामभाऊ दळवी महिला तालुका प्रमुख योगीता शिर्के, महिला संघटक उर्मिला लाटे इत्यादी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...