Saturday 30 October 2021

पालिकेच्या विठ्ठलवाडी तलावाची झाली गटार गंगा .... "तलावाच्या प्रवेशद्वारालाआले कचराकुंडी स्वरूप तर लगतच्या रस्त्यावरील गटारांची उघडी झाकणे मृत्यूला देत आहेत आमंत्रण"...

पालिकेच्या विठ्ठलवाडी तलावाची झाली गटार गंगा ....
"तलावाच्या प्रवेशद्वारालाआले कचराकुंडी स्वरूप तर लगतच्या रस्त्यावरील गटारांची उघडी झाकणे मृत्यूला देत आहेत आमंत्रण"...


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी तलावाच्या सुशोभीकरणावर पालिका प्रशासनावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करून ही तलावात कचरा, गटाराचे पाणी शिरत असल्याने तलावाच्या पाण्यात जलपर्णीने विळखा घातल्याने तलावाला हिरवी झालर पसरली असल्याने तलावाला गटाराचे स्वरूप आले आहे तर दुसरी कडे दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या तलावाच्या प्रवेशद्वारावर कचरा कचराकुंडी निर्माण केली असून लगतच्या रस्त्या वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे  गटारांची झाकणे तुटल्याने उघड्या गटारांची झाकणे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना व लहान मुलांना मृत्यूचा साफळा बनली आहेत.


     कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने कल्याण पूर्वेतील काटेमानवली नजीक असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पुलाच्या पायथ्याशी असलेल्या विठ्ठलवाडी तलावाच्या सुशोभीकरणासाठी
प्रशासनाने लाखो रुपयाचा खर्च करत  तलावात रंगीत करंज्या सह विद्युत रोषणाई, संरक्षक कठडा आणि तलावाच्या काठावर बगीचा बनविण्यात आला होता. मात्र काही महिन्यातच या तलावाचा रंग उडाला असून कठडा तुटला आहे तर रंगीत कारंजे बंद पडले होते.


आजूबाजूच्या वस्ती मधील सांडपाणी या तलावात सोडले जात असल्याने तसेच साम्य तलावात कचरा टाकण्यात येत असल्याने या तलावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते .त्या नंतर स्थानिक नगर सेवक व विधान परिषदेच्या माजी आमदारांच्या विकास निधीतून पुन्हा तलावाची स्वच्छता, प्रवेशद्वार ,लाईटस, तलावाच्या संरक्षण भितींची दुरुस्ती व बाजूने जाळी लावणे ,रंग रंगोटी, आदी कामे करन्यात आली होती मात्र तलावाच्या आजू बाजूच्या चाळी व वसाहतीत घरांचे व गटाराचे सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने साफ सफाई केलेल्या तलावाला अस्वच्छतेने व दुर्गंधीने ग्रासले व पुन्हा तलावातील अस्वच्छ पाण्यावर जलपर्णीने विळखा घातल्याने तलावावर हिरवी झालर पसरू लागल्याने सुशोभीकरणा वर केलेला कोट्यावधी रूपयाचा खर्च वाया गेला आहे. 


एका कोपर्यात दुर्गंधीच्या गर्तेत तलाव शेवटची घटका मोजत निपजित पडल्याचे दिसून आहे.दुरावस्थेत अडकलेल्या तलावाच्या प्रवेशद्वारा वर आजू बाजूच्या परिसरात राहणारे नागरिक कचरा आणून टाकीत असल्याने प्रवेश द्वारालाच कचरा कुंडीचे स्वरूप आले आहे तर या तलावाच्या लगतच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून  बाजूच्या भागा जाणाऱ्या अवजड चारचाकी वाहना मुळे यारस्त्यावरील गटारांची झाकणे तुटली असल्याने या उघड्या गटारा पासून बचाव करत येजा करावी लागत आहे.
 

सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले या तलाव वारंवार साफ केला जातो तसेच आजू बाजूच्या परिसराची साफ सफाई केली जाते मात्र या तलावाच्या आजू बाजूच्या परिसरातील स्थानिक लोक व मच्छी विक्रेत्यांची चिकन मटण विक्रेत्यांची दुकानदार आपल्या दुकानातील घाण व कचरा तलावात टाकतात तसेच या दुकानदारा माल पुरविण्यासाठी येणाऱ्या गाड्यामुळे रस्त्यावरील गटारांची चेंबर तुटले जातात या बाबत अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे त्यांनी सांगितले  पालिका प्रशासन कचरा टाकणाऱ्या या दुकांदारावर  कारवाई करावी तसेच उघड्या गटारांची चेंबरची झाकणे बसवावी या साठी नजीकच असलेल्या रिक्षा स्टॅन्ड मधील रिक्षा चालकांनी पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे मात्र पालिका प्रशासन दुलक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले तलावा शेजारी रस्त्यावरील उघड्या चेंबर मुळे आजू बाजूच्या परिसरात राहणारे वृद्ध नागरिक व लहान मुलांना आपला जीव वाचावीत रस्त्यावरून येजा करावी लागत असल्याने रस्त्यातील गटारांच्या चेंबरची तुटलेली झाकणे मृत्यूचा साफळा बनली आहेत.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...