Thursday 28 October 2021

अभिषेक मोरे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला होता आंदोलनाचा इशारा.!! ------------------- "युवासेनेच्या मागणीला यश"

अभिषेक मोरे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला होता आंदोलनाचा इशारा.!!
-------------------
"युवासेनेच्या मागणीला यश"


कल्याण, (अण्णा पंडित) : कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थी, पालक अथवा संबंधितांना कोरोना झाल्यास ते स्वतः जबाबदार राहणार असल्याबाबतचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडुन लिहुन घेतले जात होते. बिर्ला महाविद्यालय प्रशासनाचे सदरचे कृत्य असंवैधानिक आणि गैर असुन शासनाने असे कुठलेच निर्देश महाविद्यालय आणि शाळा कॉलेजला दिले नसल्याचे युवासेनेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्था चालकांच्या निदर्शनास आणून दिले. 


विद्यार्थी किंवा पालकांकडून 'कोरोनाची लागण झाल्यास महाविद्यालय जबाबदार असणार नाही किंवा संसर्ग झाल्यास तुम्ही स्वतः जबाबदार असाल'. अशा आशयाचे हमीपत्र लिहून देण्याची सक्ती बिर्ला महाविद्यालय प्रशासन व प्राचार्यांकडून करण्यात येवू नये यासाठी युवासेना कल्याण उपजिल्हा अधिकारी अभिषेक अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बिर्ला महाविद्यालयाचे संचालक नरेशचंद्र आणि महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. 


यांच्यासोबत हमीपत्रामध्ये बदल किंवा हमीपत्र रद्द करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असुन संचालक नरेशचंद्र यांनी युवासेनेची विनंती मान्य करून लगेचच संबंधित हमीपत्रामध्ये बदल करण्याचे निर्देश सबंधितांना दिले आहेत. 


अभिषेक मोरे यांच्या नेतृत्वाखाली भेट देण्यास गेलेल्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा चिटणीस सुचेत डामरे, शहर अधिकारी भुषण तायडे, विधानसभा अधिकारी अभिजित बोले, विधानसभा समन्वयक प्रतिक पेणकर, मोहोने-टिटवाळा शहर अधिकारी दिनेश निकम उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !! भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉंग्रेसचा म...