Sunday 31 July 2022

कांबा ग्रामपंचायत हद्दीत खळबळ ? तीनशे सत्तर एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश, पंधरा वर्षाच्या लढाईला यश !

कांबा ग्रामपंचायत हद्दीत खळबळ ? तीनशे सत्तर एकर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश, पंधरा वर्षाच्या लढाईला यश !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झालेल्या कांबा ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे, ३७० एकर जमीन ही सरकार जमा करण्याचे आदेश कल्याण चे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजीत भांडेपाटील यांनी नुकतेच दिले असून यामुळे गेली १५ वर्षे कायदेशीर लढा देणारे शेतकरी, गोरगरीब आदिवासी यांना अखेरीस यश मिळाले आहे. त्यामुळे या परिसरात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कल्याण मुरबाड महामार्गाला लागुन कांबा ग्रामपंचायत हद्दीत शासनाची शेकडो एकर जागा आहे, येथेच शहा आणि कंपनीची देखील शेकडो एकर जमीन आहे, कांबा ग्रामपंचायत हा औद्योगिक पट्टा म्हणून विकसित झाल्याने येथे जागेला सोण्याचा भाव प्राप्त झाला आहे. येथील आदिवासी, शेतकरी, गोरगरीब हे वर्षानुवर्षे शेती करत आहेत, पर्यायाने यातील बहुतांश जमीनीवर यांची कब्जे वहिवाट आहे, त्यामुळे सर्व्हे नंबर, ५१, १, १५० एकर, ३५, १-१४ एकर, ७७-१७० एकर, ६४, ३५ एकर आणि सर्व्हे नंबर १२५-१ एकर अशा सुमारे ३७० एकर पेक्षा जास्त जागेचा कुळवहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे. संजय शहा, राजेश शहा, शांतीलाल शहा, मिलिंद शहा विरुद्ध देवराम सुरोशे, शाताराम बनकरी (मयत) भागीरथी शांताराम बनकरी, विठ्ठल बनकरी, भगवान बनकरी, बुधाची बनकरी, नारायण बनकरी, सोनूबाई भोईर, सुमन भोईर, कल्पना चौधरी, राजेंद्र कुंडले, सोमित्र गोसावी,(मयत) वांसती गोसावी, सचिन गोसावी, आदिती गोसावी, अनुराधा गोसावी, अंजली कळसकर असा हा वाद सुरू होता. गेली १५ वर्षे विविध प्रकारच्या न्यायालयात ही केस सुरू होती. अखेरीस शहा आणि कंपनी हे शेतकरी असल्याचे पुरावे सादर करु न शकल्याने कल्याण उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित भांडेपाटील यांनी वरील सर्व्हे नंबर मधील सुमारे ३७० एकर जमीन ही सरकार जमा अर्थात यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठी कांबा यांनी फेरफार नोंद करून सदर ७/१२ उता-यावर महाराष्ट्र शासन अशी नोंदी केली आहे. परंतु मंडल अधिकारी यांच्या कडून फेरफार नोंद मंजूर करण्यात आलेली नाही. ते लवकर करतील अशी अपेक्षा शेतकरी व आदिवासी यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात कल्याण प्रांताधिकारी डॉ. अभिजित भांडेपाटील यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही, तर तलाठी कांबा, राजेश दळवी हे म्हणाले, आपण याबाबत फेरफार नोंदवले आहेत.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...