Sunday 31 July 2022

श्री समर्थ क्लिनिक च्या माध्यमातून स्थानिकांना विविध आजारांवर मोफत औषधोपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न...

श्री समर्थ क्लिनिक च्या माध्यमातून स्थानिकांना विविध आजारांवर मोफत औषधोपचार व मार्गदर्शन शिबिर संपन्न...


पालघर/ प्रतिनिधी :

श्री समर्थ क्लिनिक, कृष्णा आय व्हिजन, वाडा हॉस्पिटल आणि श्री पाटील मेडिकल यांनी वाडा तालुक्यातील खानीवली सारख्या मागास भागात आरोग्य सुविधांची असणारी गरज लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील श्री समर्थ क्लिनिक, खानिवली येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करून ग्रामीण रुग्णांना मोफत सेवा देण्याचा प्रयत्न केला. या आरोग्य शिबिरात वाडा हॉस्पिटलचे नामवंत डॉ. अमित शर्मा, श्री समर्थ क्लिनिक चे डॉ. भुषण पष्टे, डेंटिस्ट डॉ. श्रेयस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. 


         या आरोग्य शिबिरात ईसीजी, ब्लडप्रेशर, शुगर तपासणी, डोळ्यांचे आजार व तपासणी, दातांची तपासणी व इतर जनरल आजार अशा प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान या शिबिराची सुरुवात करताना गावचे पोलीस पाटील नितीन पाटील व उपस्थित डॉक्टर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व श्री गणेश यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या शिबिरात गावातील लोकांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग घेऊन आपल्याला असलेल्या आजारावर अगदी डॉक्टरांसोबत मोकळेपणाने तपासणी करून घेतली.
             या शिबिराप्रसंगी आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉ. दिपेश पष्टे, कृष्णा आय व्हिजनचे कल्पेश पष्टे, दिपक पांचाळ, श्री पाटील मेडिकल चे देवेश पाटील, लॅब कर्मचारी राहुल पाटील तसेच संस्थांचे इतर पदाधिकारी व सदस्य, श्री समर्थ क्लिनिक व वाडा हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग स्थानिक आशा वर्कर, तालुक्यातील पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...