Saturday 30 July 2022

राज्यात पिक स्पर्धेसाठी ११ पिकांचा समावेश *शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

राज्यात पिक स्पर्धेसाठी ११ पिकांचा समावेश
*शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन


बुलडाणा, बातमीदार : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वायरी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग आणि उडीद या ११ पिकांचा समावेश समावेश करण्यात आला आहे. 
तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र एक हजार हेक्टरहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहणार आहे.
एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते वगळून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षांत ज्या शेतकऱ्यांची तालुका पातळीवर प्रथम दोन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवर पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यामस पात्र असतील. तालुका आणि जिल्हा पातळीवरील पिकस्पर्धा स्वतंत्र होणार आहे. खरीप हंगामातील मुग आणि उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२२ आणि इतर पिकांमध्ये भात, ज्वांरी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी दि. ३१ ऑगस्ट २०२२ आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व जिल्हा कृषि संचालक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...