Saturday 30 July 2022

लोकांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठीच तर आपण इथे आहोत- आमदार सुनिल भुसारा

लोकांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठीच तर आपण इथे आहोत- आमदार सुनिल भुसारा 


जव्हार -जितेंद्र मोरघा :

                   राज्यात सध्या आझादी का अमृतमहोत्सव साजरा होत असून या निमित्ताने महावितरण मंडळाकडून उर्जा महोत्सवांचे आयोजन करून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत नुकताच जव्हार येथे हा कार्यक्रम साजरा झाला असून यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आमदार सुनिल भुसारा उपस्थित होते यावेळी आमदार भुसारा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महावितरणाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कामांची प्रशंसा करतानाच ग्राहकाशी सौहार्दपुर्ण वागण्याच्या सुचनाही दिल्या कारण आपण सगळे लोकांसाठी असून तुम्हाला लोकांचे ऐकावेच लागेल कारण तुमची नौकरी तुम्ही स्वच्छेने स्वीकारली आहे यामुळे सेवक म्हणून काम करताना ग्राहकाचे समाधान हेच तुमचे पहिले आणि अंतिम ध्येये असायला हवे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
    पुढे बोलताना भुसारा म्हणाले कि तुम्ही असो कि मी आज इथे असो हे लोकांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठीच आहोत कारण मला आमदार होण्यासाठी किंवा तुम्हाला अधिकारी होण्यासाठी कोणी सांगितलेले नव्हते, मी लोकांच्या दारात गेलो होतो मते मागायला त्याच प्रमाणे तुम्हीही हि नौकरी मिळावी म्हणून अनेक प्रयत्न केले, यामुळे आपण स्वेछेने या जागेवर आहोत यामुळे आपल्याला लोकांचे समाधान करावेच लागेल असे ते म्हणाले यावेळी भुसारा यांनी या भागात वीज गेल्यास पहिला फोन आमदाराला येतो आजच्या तरुण पिढीला जशी वीज हवीय तशीच मोबाईचे नेटवर्कही हवे यामुळे या भागात बऱ्यापैकी टॉवर उभारण्यास मला यश आले असून यापुढेही अनेक भागात नेटवर्क पोहचवायचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, याच बरोबर अनेक घरा घरांत वीज पोहचली असून वीजचोरीचे प्रमाणही कमी झाल्याबाबत समाधान व्यक्त करताना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांवर राग काढु नये तसेच आलेल्या ग्राहकांशी प्रेमाने बोलून त्यातून मार्ग काढावा असेही आवाहन केले.
     यावेळी वीज असताना आणि नसताना त्याच प्रमाणे वीजेचे महत्व या बाबत अनेक कलाकारांनी छोट्या नाटीका सादर करून जनजागृती केली त्याच प्रमाणे महावितरणाने आजवर केलेल्या आणि करणार असलेल्या अनेक कामांची उजळणी याठीकाणी केली त्याच बरोबर अनेक लाभार्थ्याचे सत्कार याठिकाणी करण्यात आले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, प्रांताधिकारी आयुषी सिंग याच बरोबरच महावितरणचे नगावकर मॅडम आणि अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...