Sunday 31 July 2022

मुंबई गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात, राऊतांसह अधिकारी ईडी कार्यालयाकडे रवाना

मुंबई गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात, राऊतांसह अधिकारी ईडी कार्यालयाकडे रवाना

                  ईडी कार्यालयात जाताना राऊत
अरूण पाटील, भिवंडी (कोपर), दि. ३१ :
        तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी फोर्ट येथील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. तेथेच त्यांची पुढील चौकशी होणार आहे.
        मुंबई -गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकसा प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांच्यावर आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक सकाळी ७.३० वाजता राऊत यांच्या घरी धडकले होते. पथकात १० ते १२ अधिकारी असून त्यापैकी सात अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतली.
           दरम्यान, संजय राऊत यांच्या घरासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. भाजप व ईडी विरोधात शिव सैनिकांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. पोलिसांचाही मोठा फौजफाटा राऊत यांच्या घरासमोर तैनात करण्यात आला होता .
              पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. पथकाने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी ८३ लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
             संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांची देखील चौकशी सुरू आहे. दादरमध्ये जप्त केलेला फ्लॅट आणि अलिबागमधील जमीन या संदर्भात आता ईडी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. जमीन आणि फ्लॅट हे वर्षा राऊत यांच्यावर नावावर असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी सुरू आहे.
          राऊत यांना ईडीने २७ जुलै रोजी समन्स बजावले होते. ते अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाही. यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले होते . तेंव्हा संजय राऊत आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत हे दोघेही सध्या त्यांच्या भांडुपयेथील मैत्री  बंगल्यावर होते.
             शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान ४ टविट केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, तरीही शिवसेना सोडणार नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असे टविट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
           या वेळी अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा ठेवला होता  कुणालाही मध्ये येण्याास मज्जाव घालण्यात आला. ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते.
          राऊत यानी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र त्यानंतर आज ईडीचे पथक घरी दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या कुुटुंबीयांसमवेत संजय राऊत घरी असून अनेक प्रकरणात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असे ईडीच्या समन्सनंतर राऊतांनी म्हटले होते.
                रोज सर्वांची सकाळ खराब करणार्यांची सकाळ आज खराब झाली यामुळे चांगले वाटतंय, पत्राचाळीत राहणाऱ्या गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल. राऊत झुकेगा नही असे म्हणत होता, मात्र आता आत सुकेंगा नही असे विचारा त्यांना असा टोला आमदार नितेश राणेंनी लगावला आहे. भ्रष्टाचार केला म्हणून त्याची शिक्षा भोगावी लागेल, यांचे सहकारी म्हणतील की सत्तेचा गैर वापर सुरू आहे, मात्र लोकांना फसवल्यावर त्याची किंमत मोजीवी लागेलच असेही राणेंनी म्हटले आहे.
               या प्रकरणात संजय राऊत् यांचा काही संबंध नाही. असे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला गेले नाही, त्यांनी वेळ मागितला होता. मात्र हे सुडाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊतांच्या बोलण्यामुळे, आणि सामनातील अग्रलेखांमधून होणाऱ्या टीकेचा सुड उगवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरेंना दाखवायचे आहे की बघा तुमच्या जवळच्या माणसांना देखील आम्ही अटक करू शकतो. शरण या नाही तर ईडीची कारवाई होईल असे म्हणताना अरविंद सावंत म्हणाले की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे असा आरोप केंद्र सरकारवर केला आहे.
          अखिर हिसाब देना होगा, असे म्हणतांना किरीट सोमय्यांनी १२०० कोटींचा पत्राचाळ घोटाळ्याचा असो की माफियागिरीसह लोकांना धमक्या देणे असो की मविआ सरकारने केलेल्या घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागेल असे म्हणत नवाब मलिकांच्या बाजुला संजय राऊत जातील असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

ईडीच्या  कारवाईतील मुख्य मुद्दे.
---------------------------------------------------------------
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू, फ्लॅट विकण्याचा नावाखाली १३४ कोटी जमा केले.
--------------------------------------------------------------
म्हाडाच्या इंजीनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी.
--------------------------------------------------------------
एकूण १०३९.७९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय.
-----------------------------------------------------------
१०० कोटी रुपये प्रवीण राऊतांच्या अकाउंटवर ट्रान्सफर.
--------------------------------------------------------------
प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांना हस्तांतरित केली.
-----------------------------------------------------------------
५५ लाख रुपये वर्षा संजय राऊत यांना दिल्याचे समोर.
---------------------------------------------------------------
ईडीने याआधी कारवाई करत खासदार संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केले आहे. ही कारवाई काही दिवसांआधी करण्यात आली होती. एकूण ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांच्या स्थावर मालमत्ता आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...