Saturday 30 July 2022

सायले नळपाणी पुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईची ग्रामस्थांची केली मागणी !

सायले नळपाणी पुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईची ग्रामस्थांची  केली मागणी !


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यातील मौजे सायले येथील प्रचंड पाणी टंचाई असल्यामुळे शासनाने सन 2014 - 2015 साली पाणी टंचाई कायमस्वरूपी दुर करण्यासाठी सुमारे त्रेचाळीस लाख रुपये (43,00,000) इतका निधी मंजूर केला. व योजनेचे काम सुरु झाले. मात्र तेथील ठेकेदार, ग्रामसेवक व अधिकारी यांनी थातूरमातूर आणि अपुर्ण स्वरूपात काम करून, संपूर्ण निधी काढून घेतल्याचा आरोप करत सदर योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करून  ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांचेकडे तक्रार करून याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
                याबाबत मिळालेली माहिती अशी कि, ग्रामपंचायत सायले येथील नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून सुमारे त्रेचाळीस लाख रुपये (43,00,000) इतका निधी मंजूर झाला होता. व काम सुद्धा सुरु झाले. मात्र तेथील ठेकेदार तसेच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी संगनमताने थातुरमातुर काम करून या योजनेचा संपूर्ण निधी काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी प्रथमतः गटविकास अधिकारी मुरबाड यांचे कडे लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा तक्रारी केल्या. परंतु सदर तक्रारी बाबत त्यांच्या कडून कूठलीही कारवाई न झाल्याने सरते शेवटी मुख्यकार्यकारी अधिकारी ठाणे यांचेकडे तक्रार केली असून,सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...