Friday 29 July 2022

काष्ठ शिल्पकार संतोष घावट यांचा मुरबाड पोलिसां कडून सन्मान !! ** मुरबाड पोलिसांची कर्तव्या पलीकडे कौतुकास्पद कामगिरी **

काष्ठ शिल्पकार संतोष घावट यांचा मुरबाड पोलिसां कडून सन्मान !!
** मुरबाड पोलिसांची कर्तव्या पलीकडे कौतुकास्पद कामगिरी **


मुरबाड, (मंगल डोंगरे) : पोलीस खाते म्हटले कि,कायदा आणि सुव्यवस्था, असे नेहमीचे ठरलेले कर्तव,मात्र मुरबाड पोलिसांची कर्त्यव्या पलिकडे जावून कौतुकास्पद कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकताच मुरबाड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष, व कलाप्रेमी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी तालुक्यातील मिल्हे गावचे नवतरुण काष्ठ शिल्पकार संतोष घावट यांच्या लाकडावरील कोरीव कामातून बनवलेल्या हूबेहुब मुर्ती आणि प्रतिमा पाहून, त्यांचा आपल्या पोलीस ठाण्यात यथोचित सन्मान केला आहे.


केवळ कायद्याचा बडगा घेऊन न फिरता, पांढरे साहेब यांनी अवघ्या वर्षभरातच तालुक्याचा अभ्यास करून, इथल्या गुन्ह्यांबरोबर, रुढी, परंपरा, सण उत्सव, तशीच इथली कलाकृती व गुणी कलावंत शोधण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा करण्याचे पवित्र काम त्यांच्या कडून सुरु आहे. 


नुकताच सन्मान झालेल्या संतोष घावट यांनी छत्रपती शिवरायांच्या सुबक प्रतिमांबरोबर, महानायक अमिताभ बच्चन यांचीही हुबेहूब मुर्ती बनवली असुन, बच्चन यांना" ती फांगणे येथील आजीबाईनी, त्यांच्या सुप्रसिद्ध कौन बनेगा करोड पती या कार्यक्रमात भेट म्हणून सुपुर्द केली आहे. या भेटीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून, लवकरच हा भाग दुरदर्शन वर दाखवला सुद्धा जाणार असून, मुरबाडच्या मातीतील कलाकृती सर्वदूर जगभर पसरली पाहिजे. असा आशावाद सत्कारकर्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी व्यक्त केला आहे. तर आपल्यातील कलाकृती दाबून न ठेवता ति जगासमोर आणण्याचे प्रयत्न करावेत. चांगल्या गोष्टीला आणि प्रामाणिक मेहनतीला यश नक्कीच मिळते. असे भावोद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी काढून घावट यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. यावेळी व. पो.नि.प्रसाद पांढरे, स.पो.नि. अनिल सोनोने, पो. नाईक. विनायक खेडकर, पो.उप. नि. तडवी,सावंत, म.पो. शि. फाळे मँडम, जगप्रसिद्ध आजीबाई शाळेचे उद्गाते योगेंद्र बांगर सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...