Sunday 31 July 2022

अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या केदुर्ली येथील कुटुंबाला कोणी 'घर देता का घर'...... .! **निराधार कुटुंबाला घरकुल तात्काळ मिळावे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांची आग्रही मागणी.**

अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या अतीवृष्टीत घर कोसळून बेघर झालेल्या केदुर्ली येथील कुटुंबाला कोणी 'घर देता का घर'...... .!

**निराधार कुटुंबाला घरकुल तात्काळ मिळावे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे यांची आग्रही मागणी.**


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यात सुरुवातीच्या अतिवृष्टीमुळे केदुर्ली गावातील एका मोलमजुरी करणाऱ्या गरीब निराधार व्यक्तीचे घर पूर्णतः कोसळून जमीनदोस्त झाले आहे. सध्या या कुटुंबाचा संसार उघड्यावर आहे. शासकीय पंचनामाही झालाय मात्र त्या कुटुंबाला सरकारी हक्काचे घर केव्हा मिळणार या प्रतीक्षेत ते कुटुंब डोळे लावून बसले आहेत.


मुरबाड तालुक्यातील केदुर्ली गावातील सर्वसामान्य मोलमजुरी करणारे सुभाष रघुनाथ उघडे आपल्या वयस्क आई व पत्नी सह एका साध्या मोडकळीस आलेल्या घरात गेली अनेक वर्षे राहत होते. आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करून ते जीवन जगत आहेत.


मुरबाड तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या संततधार अतिवृष्टी मुळे त्यांचा निवाराच कोलमडून पडला आहे. थेट घराचे छप्परच जमीनदोस्त झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर संसार मांडण्याची वेळ आली आहे. सध्या त्यांना शेजाऱ्यांनी तात्पुरता निवारा दिला असला, तरी आपल्या कोसळलेल्या घरा कडे बघून सुभाष उघडे हे फार चिंताक्रांत आहेत. शासकीय पंचनामा झाला आहे तात्पुरती कवडीमोल मदत मिळेलही कदाचित पण राहण्याची व्यवस्था कशी होणार ? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

मोडकळीस आलेले घर असतांना आज पर्यंत सरकारी अनास्थे मुळे गरीब निराधार सुभाष उघडे यांना साधे घरकुल ही मिळाले नाही. ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. पात्र लाभार्थ्यांना डावलून राजकीय लाभा साठी धनदांडग्या लोकांना सरकारी घरकुलांचा लाभ देणाऱ्या संबंधीत यंत्रणेने मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या सुभाष उघडेना कधी न्याय देणार हा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होतोय.या प्रकरणी केदुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच काळूराम केशव म्हारसे व सदस्या कांता अनंत उघडे, सामाजिक युवा कार्यकर्ते गौतम उघडे यांनी शासन दरबारी उघडे यांना घरकुल तात्काळ मिळावे म्हणून आवाज उठवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रिपाइं आठवले पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे व तालुका उपाध्यक्ष सय्यदभाई शेख यांनी तात्काळ या उघडे कुटुंबाची भेट घेऊन शासकीय यंत्रणेशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून सुभाष उघडे यांना तात्पुरती आर्थिक मदत व अन्न धान्याची व्यवस्था केली आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...