Sunday 31 July 2022

रक्तदान शिबिरात जपली सामाजिक बांधिलकी ११६१ जणांचे विक्रमी रक्तदान ; संतोष अबगुल प्रतिष्ठानचा नालासोपारा येथे अभिनव उपक्रम !

रक्तदान शिबिरात जपली सामाजिक बांधिलकी
११६१ जणांचे विक्रमी रक्तदान ; संतोष अबगुल प्रतिष्ठानचा नालासोपारा येथे अभिनव उपक्रम !


मुंबई, बातमीदार : संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या वतीने नालासोपारा पुर्व येथील डिवाईन लाईफ हायस्कुल येथेे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सामाजिक बांधिलकी जपताना विक्रमी ११६१ नागरिकांनी आपले रक्तदान करून आदर्श घालून देत माणुसकीच्या रक्ताचे नाते आधोरेखित केले. 


यावेळी खेड, दापोली, मंडणगडचे सुपुत्र जे मुबंईमध्ये राहणारी स्वराज्य प्रतिष्ठान उमरोली, पाले ग्रामस्थ मंडळ, साकुर्डे ग्रामस्थ, वांझळोली ग्रामस्थ, पालवणी पंचक्रोशी, वांझळोली गावठान वाडी, चिखलवाडी ग्रामस्थ मंडळ, शिवराज्य प्रतिष्ठान (वसई,पालघर), तसेच देवेंद्र सावंत परीवारा तर्फे १५१ लोकांनी संतोष अबगुल प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीराला उपस्थित राहुन आपले रक्तदान केले. 


दिवसभरात नालासोपारा परीसरातील रक्तदाते यांनी आवर्जुन या रक्तदान शिबीरात जाऊन रक्तदान केले. तब्बल ११६१ जणांनी आपले रक्त या शिबिरात दान करुन एक वेगळा विक्रम नोंदवला. त्याबद्दल बोलताना उपस्थित डॉक्टरांनी, असे रक्तदान एवढ्या वर्षात कुठेही पहायला मिळालं नसल्याचे सांगितले. उपस्थितांनी अबगुल प्रतिष्ठानचे डॉक्टरांनी आभार मानले. रक्तदान शिबिरात महीलांचाही समावेश लाभला होता. संतोष अबगुल प्रतिष्ठांच्या वतीने प्रत्येक रक्त दात्यांना प्रमाणपत्र, दुध बिस्किट व जेवणाची व्यवस्था केलेली होती.
या शिबिराला अरूण जाधव नगरसेवक, निलेश देशमुख नगरसेवक, विश्वनाथ रक्ते, मनिष माईन, विनायक मांडवकर, गणेश बैकर, आशिष पाटील, दिलीप बडबे पालवणीचे अभिषेक कदम, गणेश नवगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...