Sunday 31 July 2022

कुणबी सेवा संघ संचालित नवभारत छात्रालय परिवार दापोली आणि अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस्, दापोली यांच्यातर्फे ग्रुप ग्रामपंचायत दमामे- तामोंड, ता. दापोली येथे मोफत रोपे/ कलमे वाटप !

कुणबी सेवा संघ संचालित नवभारत छात्रालय परिवार दापोली आणि अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस्, दापोली यांच्यातर्फे ग्रुप ग्रामपंचायत दमामे- तामोंड, ता. दापोली येथे मोफत रोपे/ कलमे वाटप !


मुंबई, (शांताराम गुडेकर ) :                              
             दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुणबी सेवा संघ दापोलीच्या नवभारत छात्रालय परिवारा तर्फे ग्रुप ग्रामपंचायत दमामे - तामोंड ता. दापोली येथील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार कोकम रोपे तर अश्विनी अ‍ॅग्रो फार्मस् दापोली यांचे तर्फे प्रत्येक शेतकऱ्याला दोन काळीमिरी कलमे मोफत देण्यात आली. हा कार्यक्रम आयोजित करण्यात समन्वयकाची भूमिका डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ विस्तार विभाग, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटना व कृषि विस्तार अधिकारी महाराष्ट्र शासन, सौ. गावंडे (सावके) मॅडम यानी पार पाडली.


           या कार्यक्रमात मु. दमामे - तामोंड गावामध्ये शेतकऱ्यांना १६०० कोकम रोपे आणि ८०० काळीमिरी कलमे मोफत देण्यात आली. या प्रसंगी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे सर, सरचिटणीस श्री. हरिश्चंद्र कोकमकर, तसेच दमामे - तांमोड गावचे सरपंच श्री. गंगाराम हरावडे, पोलिस पाटील श्री.संतोष बुरटे, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ वाहन चालक संघटना उपाध्यक्ष श्री.बालगुडे तसेच कृषि मित्र श्री. कांदेकर, प्रगतीशील शेतकरी श्री. अनंत बंगाल व मोठ्या संस्थेने शेतकरी बंधू-भगिनी हजर होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. प्रविण झगडे यांनी केले. यावेळी प्रा. प्रभाकर शिंदे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कोकम व काळीमिरी लागवडीचे महत्त्व आणि लागवडी संबंधिची सविस्तर माहिती या पिकांचे अर्थशास्त्र या विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे कुणबी सेवा संघाच्या विविध उपक्रमांची पुस्तिका सर्वांना देण्यात आली. 
कृषि विस्तार अधिकारी सौ. गावंडे (सावके) मॅडम, श्री.बालगुडे उपाध्यक्ष, वाहन चालक संघटना, सरपंच श्री.गंगाराम हरावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये डाॅ. प्रविण झगडे कृषि अधिकारी यानी उपस्थित सर्व मान्यवरांचे व शेतकरी बंधू-भगिनींचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...