Monday 29 June 2020

अवाच्या सव्वा दराने आलेल्या विज देयकांमुळे नागरिक हैराण !!

अवाच्या सव्वा दराने आलेल्या विज देयकांमुळे नागरिक हैराण !!

मुंबई : करोनाकाळात सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडली असतानाच, अवाच्या सवा दराने आलेल्या वीज देयकांमुळे महावितरणविरोधात सध्या राज्यभर तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र, टाळेबंदीच्या काळात वाढलेला वीजवापर आणि एप्रिलपासून वाढलेले वीजदर यामुळे वीज देयकांत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे आधीच्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापर यांच्यातील फरकाची रक्कमही देयकांत जोडण्यात आल्याने नागरिकांवर भार वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.

करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने महावितरणने गेले दोन महिने ग्राहकांना सरासरी वीज देयके पाठवली. मार्चमध्ये वीजवापराची नोंदणी घेणे, मीटरवाचन बंद पडल्याने सरासरीसाठी जानेवारी, फे ब्रुवारी या महिन्यांतील वीजवापर गृहीत धरला गेला. त्या काळात थंडीमुळे वातानुकू लन यंत्रे, पंखे यांचा वीजवापर तुलनेत कमी असतो. मात्र एप्रिल, मे व जून महिन्यात वाढत्या उन्हामुळे वीजवापर वाढतो. एरवीसुद्धा उन्हाळ्यात घरगुती ग्राहकांचा वीजवापर किमान ३० ते ४० टक्के वाढतो. त्यातच टाळेबंदीमुळे यंदा या महिन्यांत नागरिक घरांतच असल्याने विजेचा वापर आणखी वाढला. त्याचेच प्रतिबिंब वीज देयकात पडत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता टाळेबंदी शिथिल झाल्याने सर्वच वीजवितरण कं पन्यांनी वीजग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीज देयक आकारणी सुरू के ली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील वाढीव वीजवापराचे फटके वीज देयकात दिसत आहेत. शिवाय एप्रिलपासून वीजदरात बदल झाले. त्याच्या जोडीला गेल्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापरातील तफावतीची रक्कमही त्या वीज देयकात समाविष्ट आहे. वास्तव समजून घेऊन वीज ग्राहकांनी आपले वीज देयक तपासले पाहिजे. मीटरवाचनात चूक झाली असेल तर जरूर तक्रोर करावी, पण वीज कं पनी चुकीचेच वीज देयक देत आहे, असा गैरसमज करून घेऊ नये, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...