Monday 29 June 2020

मुंबईत सर्वसामान्यांना दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासाला मज्जाव!

मुंबईत सर्वसामान्यांना दोन किलोमीटरपेक्षा अधिक प्रवासाला मज्जाव!

मुंबई : टाळेबंदी शिथिल झाल्यापासून मुंबईतील रस्त्यांवर होत असलेल्या वाहनांच्या, पादचाऱ्यांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवी ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिली आहे. रहिवास क्षेत्राच्या दोन किलोमीटर परिघाबाहेर मुक्त संचार करण्यास नागरिकांना पोलिसांनी मज्जाव केला आहे. अत्यावश्यक सेवा किंवा नोकरीवर जाणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस कारवाई कुणावर व कशी करणार, याविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

या र्निबधांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तसेच निर्बंध झुगारणाऱ्यांविरोधात कारवाई होईल, असे पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी स्पष्ट केले. रविवारी हे निर्बंध लागू होताच पोलिसांनी उत्तर मुंबईसह शहरात जागोजागी नाकाबंदी करून विनाकारण फिरताना आढळलेल्या पाच हजार वाहनचालकांवर कारवाई केली.

सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनोय चौबे यांनी सांगितले की, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. घराजवळील बाजारात खरेदी करण्याऐवजी लांब अंतरावरील बाजारात जाणे, व्यायामाच्या निमित्ताने समुद्रकिनारी फिरायला जाणे या प्रकारांमुळे अशा ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. याखेरीज, बाजारांत सामाजिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे या र्निबधांचेही पालन होताना दिसत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता नागरिकांच्या मुक्त संचारावर निर्बंध आणण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे.

र्निबधांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांना आपापल्या हद्दीत नाकबंदीसह कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. नाकाबंदीत अडवून कुठून आले, कुठे जाणार, का प्रवास करत आहात, अशी चौकशी करण्यात येणार आहे.

नियम काय?

’घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मुखपट्टी अनिवार्य आहे.

’घरापासून फक्त दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या बाजारपेठा, दुकाने इत्यादी  ठिकाणी जाता येईल. व्यायामही याच मर्यादित परिसरात करावा.

’कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ही मर्यादा ओलांडता येईल. सामाजिक अंतराचा नियम न पाळणारी दुकाने बंद केली जातील.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...