Tuesday 30 June 2020

कोरोनाचा वाढता ‌प्रादुर्भाव पहाता ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर !!

कोरोनाचा वाढता ‌प्रादुर्भाव पहाता ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन जाहीर !!


कल्याण - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहे असं सांगितलं. दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधला लॉकडाउन वाढतोय असंच चित्र आहे. कारण नाशिक, ठाणे या शहरांपाठोपाठ आता कल्याण डोंबिवलीतही १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात लॉकडाउन होणं गरजेचं आहे असं महापालिकेने म्हटलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २ जुलै २०२० च्या सकाळी ७ पासून १२ जुलै २०२० च्या सकाळी ७ पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे महापालिकेने?

अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंची ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरता कल्याण डोंबिवलीत लॉकडाउन.

सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही. टॅक्सी, रिक्षा यांनाही परवानागी नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी किंवा घेण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीची परवानगी असेल.

सर्व रहिवासी घरीच राहतील आणि सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोर पालन करणं बंधनकारक

ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे त्या नियमाचे पालन बंधनकारक, त्या व्यक्तीने अगर तिच्या कुटुंबीयांनी पालन केले नाही तर कारवाई होणार

सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी ५ लोकांपेक्षा जास्त व्यक्तींची गर्दी नको

व्यावसायिक आस्थापना, कार्यालये, कारखाने, गोदाम इ. सर्व दुकाने यांचे कामकाज बंद राहणार. मेडिकली संबंधित, सतत प्रक्रिया अशा आवश्यक असलेल्या उत्पादनं आणि उत्पादक युनिट्सना संमती

सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचाऱ्यांसह चालवण्याची परवानगी असणार आहे. चेक काऊंटर पासून आणि एकमेकांपासून ३ फूट अंतर ठेवणं बंधनकारक

अत्यावश्यक वस्तू, सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने, आस्थापनांना वरील प्रतिबंधातून वगळण्यात आलं आहे..

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दूध, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), बेकरी, किराणा दुकाने, भाजीपा इत्यादी खाद्यपदार्थ दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरु राहतील.

मेडिकल स्टोर्स, रुग्णालयं, दवाखाने, गॅस सिलेंडर पुरवठा, उद्ववाहन दुरुस्ती यांच्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही

दूध विक्रीची दुकानं पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत सुरु ठेवून विक्री करता येईल

अशा सगळ्या सूचना देऊन २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत कल्याण डोंबिवलीतही लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...