Saturday 27 June 2020

"खोपिवली येथील पुलाच्या अर्धवट कामामुळे व पर्यायी रस्ता पुरात वाहून गेल्या मुळे म्हसा-धसई संपर्क तुटला"!

"खोपिवली येथील पुलाच्या अर्धवट कामामुळे व पर्यायी रस्ता पुरात वाहून गेल्या मुळे म्हसा-धसई संपर्क तुटला"!,,


मुरबाड (मंगल डोंगरे ) - मुरबाड तालुक्यातील म्हसा- धसई - वैशाखरे अशा ,कल्याण -अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणा-या रस्त्याच्या नुतणीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपपासुन सुरु असुन ते काम आजमितीस अपुर्ण व अर्धवट स्थितीत असल्याचा फटका या रस्त्यालगत असणा-या गावांना बसत असल्याचे निदर्शनास येत असुन,आज अखेर खोपिवली नदीच्या पुराच्या पाण्यात पर्यायी रस्ता,आणि पुलाच्या दोन्ही बाजुचा भराव वाहून गेल्याने धसई कडून आपापल्या वाहनांनी  आलेले शंभर हुन अधिक प्रवासी आपल्या वाहनांसह  खोपिवली नदीच्या पलिकडे अडकून पडल्याची घटना घडली आहे.तर काही प्रवाशांना लाकडी सिडीचा आधार देवून पुलावरुन खोपिवली हद्दीत उतरण्यास नागरिकांनी मदत केल्याने त्यांची सुटका झाली आहे. 


            सदर प्रसंग बिकट बनला असुन ,संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना हि समस्या म्हणजे जिवघेणी बाब ठरू शकते. याबाबत संबधित ठेकेदारा कडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडुन  कुठलीच  उपाय योजना अमंलात आली नसुन ,नदीपलिकडे मिल्हे गाव हद्दीत,  धसई बाजारपेठे कडे जाणारे प्रवासी नागरिक, व खोपिवली गावातील  मिल्हे हद्दीतील  शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  याबाबत संबधित ठेकेदाराकडुन तात्काळ पर्यायी व्यवस्था न झाल्यास खोपिवली  परिसरातील नागरिक आंदोलन छेडणार असल्याचे नागरिकां कडून बोलले जात आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...