Saturday 27 June 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड तालुका सात दिवसांसाठी कडकडीत बंद !!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड तालुका सात दिवसांसाठी कडकडीत बंद !!


मुरबाड (मंगल डोंगरे )        
कोरोनामुक्त असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका कोरोनामय होत असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता तालुक्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठांसह मुरबाड शहर आता सात दिवसांसाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश कल्याण उपविभागिय अधिका-यानी जारी केले आहेत.
                कोरोना संकटात गेल्या तिन महिन्यांपासुन कोरोना मुक्ती साठी सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा, आरोग्य खाते,यांसह अनेक सामाजिक, राजकीय, संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते, आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कोरोना संकटाचा सामना करत होते.आजुबाजुला असलेले कल्याण, डोंबिवली, ठाणे, शहापुर, कर्जत, बदलापुर, नेरळ,अशा ठिकाणी धुमाकुळ सुरु असताना आमचा गड अभेद्य राखला जात होता.मात्र हे चित्र फार काळ टिकु शकले नाही. आणी तितक्यातच कोरोनाची वक्रद्रुष्टी आमच्या तालुक्याला लागली. आणि कोरोना बाधितांची तालुक्यात ये-जा सुरु झाली. आम्ही मात्र आमच्या निधड्या छातीने कोरोनाशी दोन हात करत होतो.शासनाचे नियम,आमची सुरक्षा आम्ही पाळत होतो.पण आमची लढाई आता परकीय आक्रमनामुळे  अयशस्वी ठरु लागली आहे.कुठेतरी ,कोणीतरी आमचाच भुमिपुत्र, आमचा नातलगच,मात्र तो गेल्या  कित्येक वर्षांपासून गावकुसाबाहेर म्हणजेच पोटापाण्यासाठी बाहेर पडलेला, परंतु  या संपूर्ण महासंकटाच्या तावडीतुन,लाँकडावुन मधून स्वतःला सावरत गावाकडील आई,वडील,नातेवाईक यांच्या भेटीसाठी आसुसलेला,आणि गावाकडे काहीतरी निमित्ताने सर्वांना. भेटण्यासाठी आलेला.तो गावाकडे येतो काय,सर्वांना भेटुन पुन्हा आपल्या  चिल्यापिल्यांसाठी शहराकडे जातो काय .आणि कोरोनाच्या तावडीत सापडतो काय ,तोपर्यंत सर्वच निपचित होतात. त्याकारणाने गाव सिल केलं जाते काय ? तोपर्यंत कोरोना आणि आम्ही एकमेकां पासून कोसोमैल दुर होतो.मात्र हिच गोष्ट आता आमच्या काळजालाच येवून भिडली आणि गावा गावात खेडोपाडी कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. हां हां म्हणता कोरोनाचे रुग्ण गल्ली बोळात सापडु लागले.आणि मुरबाड तालुका बाधित होवू लागला.एक एक करता तालुक्यात तब्बल 32 पाँझीटिव्ह रुग्ण सापडले.पैकी 7 जण बरेही  झालेत.24 जण उपचार घेत आहेत.1 जण दगावला असुन काल परवाची आकडेवारी पाहिली तर एका  दिवसात 7 तर एका दिवसात 9 जण आढळून आले आहेत.ज्यामध्ये एक मुरबाड नगरपंचायत कर्मचारी, एक पोलीस अधिकारी, तर एक जण राजकिय नेता आहे.याशिवाय जवळपास 16 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असुन 120 जण क्वारंटाईन असल्याने  तालुक्यातील वातावरण भितीदायक झाले आहे.मात्र आज नव्याने सापडलेल्या तिन पाँझिटिव्ह रुग्णांमुळे तालुक्यातील आनखी तिन गावे सिल करण्यात आली असुन बाधितांना उपचारासाठी हलविण्यांत आले आहे.त्यामुळे दररोज वाढणा-या कोरोना रुग्णांमुळे
       वाढत्या रुग्ण संख्येचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात, देशात, सगळी कडे अनलाँक असताना सुद्धा प्रशासनाला मुरबाड शहरासहं, वैशाखरे, शिवळे,, सरळगाव, टोकावडे, धसई, म्हसा, अशा संपूर्ण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा दिनांक 27 जुन पासून 3 जुलै पर्यंत,पुढील सात दिवसांसाठी लाँकडाऊन घोषित करावा लागला आहे.ज्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी होवून निर्माण झालेली साखळी तुटून सर्वसामान्याना आपले जिवन जगता येईल.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...