Tuesday, 30 June 2020

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक की बिनविरोध?

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीची निवडणूक की बिनविरोध?


कल्याण (संजय कांबळे) ठाणे जिल्ह्यातील पाच पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची अडिज वर्षाची मुदत संपत आल्याने यांची निवडणूक नुकतीच जाहिर झाली असून मागील प्रमाणे याही वेळी सभापती बिनविरोध निवडणार की निवडणूक होणार हाच खरा प्रश्न आहे.
राज्यासह अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी युती केली. परंतु याला कल्याण तालुका अपवाद ठरला येथे कल्याण पंचायत समितीवर भाजपा ५,शिवसेना ४,आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे एकूण १२ सदस्याचे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी अशी युती आहे. कल्याण ला देखील शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३असे पक्षीय बलाबल असताना या दोन पक्षाची सत्ता येत असताना वरिष्ठांच्या आशिर्वादाने तालुक्यात अशी काही चक्रे फिरली की सत्तेपासून आम्ही दूर राहणार असा म्हणणारा भाजपा सत्तेत सहभागी होऊन प्रथम उपसभापती पद व नंतर सभापती व उपसभापती अशी एक हाती सत्ता पंचायत समितीवर मिळवली
सध्या कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपा च्या श्रीमती रंजना केतन देशमुख आणि उपसभापती पदी याच पक्षाचे यंशवत दळवी विराजमान आहेत पक्षांतर्गत ठरलेल्या ठरावानुसार अडिच वर्षे मुदत पूर्ण झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी येत्या रविवारी म्हणजे ५जुलै २०२० रोजी पाच तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती /उपसभापती पदाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
नुकतेच जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये कल्याण पंचायत समिती चे सभापती पद हे सर्वसाधारण महिला यासाठी राखीव असल्याने यावेळी सभापती कोण याबाबतीत चर्चेला उधाण आले असले तरी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे जे नाव निश्चित करतील ते कल्याण तालुक्याचे सभापती होतील हे जवळजवळ फिक्स आहे. त्यामुळे याहीवेळी भाजपा शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणार असेच वाटते आणि हो शिवसेना देखील काही चमत्कार करेल असे तर अजिबातच शक्य नाही कारण "बिगबाॅस" सबकी खबर रखता है! आता प्रश्न इतकाच आहे की निवडणूक की बिनविरोध?

No comments:

Post a Comment

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल !

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल ! मुंबई, प्रतिनिधी :-  उन्हाळी सुट्टीला सुरुवात होताच अनेकजण आपला परिवार किंवा मित्रमंडळासह...