पत्रकार मंगल डोंगरे यांना"कोरोना महायोद्धा "राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान !!
मुरबाड (प्रतिनिधी ) गेल्या तिन-चार महिण्यां पासुन जगाच्या पाठीवर उद्भवलेल्या कोरोना सारख्या महामारीच्या संकटात संपूर्ण जग सापडले असताना, महाराष्ट्राच्या कोना-कोपरा ही या संकटाने सोडला नसुन,शहरी भागापासुन ते खेडेपाड्यातही धुमाकुळ घातला आहे.अशा कठीण प्रसंगी पत्रकार श्री. मंगल डोंगरे, यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन,नगरपंचायत प्रशासन यांनी जनतेसाठी दिलेल्या सुचना, आदेश,निर्देश, जनते पर्यंत पोहचवुन,जनतेला, वारंवार, साबणाने हात धुवणे,सँनिटायझर वापरणे,सामाजिक सुरक्षितता पाळणे,तोंडाला मास्क अथवा रुमाल लावणे, अशा प्रकारे सावध करून जनजागृती चे कार्य केले.तसेच लाँकडाऊन काळावधीत गोरगरीब मजुरांना अन्न धान्य, तसेच जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले,प्रवासात अडकलेल्या प्रवाशांना चहा, नाष्टा,जेवणाची व्यवस्था केली,त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करुन दिली. कित्येक परप्रांतीय मजुरांना मोफत वैद्यकीय तपासणी दाखले,प्रवासी पास मिळवून देण्यासाठी मदत केलीे,आणि सर्वसामान्य माणसाला कोरोना आजार होवु नये म्हणून बहुमूल्य काम केले.त्याची दखल घेवून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य,च्या वतीने पत्रकार मंगल डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार तथा कोरोना महायोद्धा पुरस्कार देवून समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार आणि प्रदेश सचिव डॉ. आशिषकुमार सुना,आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुणजी ठोंबरे यांनी सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले.सदर प्रसंगी पत्रकार मंगल डोंगरे यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment