Wednesday, 1 July 2020

वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर चे काम प्रगतीपथावर, ग्रामीण भागाला मोठा आधार?!

वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटर चे काम प्रगतीपथावर, ग्रामीण भागाला मोठा आधार?! 


कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या गावासह ग्रामीण भागातील कोरोना कोव्हीड 19 च्या रुग्णांसाठी मोठा आशेचा किरण ठरणारे वरप येथील राधा स्वामी संत्सग च्या प्रशस्त जागेवर कोरोना कोव्हीड सेंटर चे काम प्रगतीपथावर असून ते येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.


सध्या कल्याण डोंबिवली सह उल्हासनगर अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे आणि आता ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत चा विचार केला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हारळ 60,वरप 10, कांबा 1,आणि पावशेपाडा 1असे कोरोना कोव्हीड चे रुग्ण आहेत म्हारळ गावाचा विचार केला तर येथील एकाच घरात 10/11 पाॅझिटिव पेंशंट साडत आहे. या पाठोपाठ वरप येथे देखिल रुग्ण वाढत आहे. असे असताना कल्याण, भिवंडी किंवा इतर ठिकाणी ग्रामीण भागातील पेंशंट ला दाखल करून घेतले जात नाही. हाऊसफुल्ल, बेड नाही असे सांगितलं जातय त्यामुळे ग्रामीण भागातील पेंशंट ची अवस्था" ना घर का ना घाट का" अशी अवस्था निर्माण झाली होती त्यामुळे कल्याण ग्रामीण विशेष करून म्हारळ वरप कांबा या गावांना कोणी वाली नाही असे परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कल्याण तहसीलदार दीपक आकडे, कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती श्वेता पालवे, माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामेश्वर मोरे, काही सुजाण लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वरप येथील राधा स्वामी संत्सग येथील भव्य अशा जागेवर कल्याण ग्रामीण भागातील  नागरिकांसाठी सुमारे 200 बेडचे कोरोना कोव्हीड केअर सेंटर चे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट देऊन सूचना दिल्या त्यानुसार तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी भले उशीरा का होईना सतत पाठपुरावा करून काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यामध्ये एक्सरे सेंटर, इसीजी, कंट्रोल रूम, डाॅक्टर रुम, नर्स रुम आदी बनविण्याचे काम सुरू आहे. शिवाय शौचालय, बाथरूम, वाॅशरुम आदी सोईसुविधा निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे या केअर सेंटर चे नोडल आॅफिसर डॉ कापूसकर यांच्याकडून या साठी लागणारे स्टाफ तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या सुचनेनुसार तहसीलदार दीपक आकडे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्रकार संजय कांबळे, राधा स्वामी संत्सग चे संचालक राजेश लुल्ला, येथे वरिल सर्व सोईसुविधा निर्माण करणारे शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी येत्या पाच ते सहा दिवसांत हे सर्व कामे पुर्ण करुन वरप येथील कोव्हीड केअर सेंटर सुरू होईल असे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले. तर या कोव्हीड केअर सेंटर मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे आणि त्यांची ससेहोलपट थांबणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बाबतीत देर आये है असे म्हणायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!

जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !! म...