हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त माणगाव मध्ये कृषी दिन साजरा !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बाबत त्यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १ जुलै रोजी माणगाव तालुक्यातील रेपोली, निळगुज , लोणारे गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यामार्फत मार्गदर्शन करून कृषी दिन साजरा करण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व तो समृद्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव तालुका यांच्यामार्फत कृषी दिनांक १ जुलै ते ७ जुलै २०२० या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ करतेवेळी उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव श्री मिलिंद जाधव , तालुका कृषी अधिकारी श्री पोपट नवले, मंडळ कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी उपस्थित होते. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव शेतकऱ्यांना काकडी लागवड तंत्रज्ञान व भात लागवडीबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना कलमी रोपे वाटप करण्यात आली.
सदरील सप्ताहात खरीप हंगाम २०२० यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपविभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग लागवड, हवामान आधारित फळपीक विमा योजना, भात पिकाच्या लागवडीचा विविध पद्धती त्यावरील कीड रोग व्यवस्थापन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी मनुष्यबळात कमी खर्चात पिकाचे उत्पादन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment