Saturday 27 June 2020

उल्हासनगरात सापडले 60 कोरोना बाधित रुग्ण पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नगरसेवकांना कोरोनाची लागण!

उल्हासनगरात सापडले 60 कोरोना बाधित रुग्ण
पालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नगरसेवकांना कोरोनाची लागण!

                 
उल्हासनगर, सिध्दांत गाडे  -  उल्हासनगरमध्ये 27 रोजी जून रोजी 60 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 44 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 874 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की उल्हासनगर महानगर पालिका क्षेत्रात 27 जून रोजी उल्हासनगर शहरात कोरोनाचे 60 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी 610 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून आतापर्यंत 874 कोरोना मुक्त रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 610 संक्रमीत व्यक्ती कोरोना केअर सेंटर कक्षात उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर  874 रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

आश्चर्याची गोष्ट अशी की शहरात कोरोनाने आपला मोर्चा पालिका कार्यालयात वळवला असून आतापर्यंत पालिकेचे कित्येक अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि नगरसेवकांना कोरोनची लागण झाली असून शहरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
आश्चर्याची बाब अशी की जर एखाद्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास पालिका प्रशासनाकडून संपूर्ण परिसर सील करण्यात येतो. तर दुसरीकडे मात्र एखाद्या उच्च भ्रू वस्तीतील इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास सदर इमारत सील न करता केवळ त्या घरातील लोकांना मोकळे सोडून दिले जाते परिणामी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो याकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यासंदर्भात पालिकेत नव्याने रुजू झालेले पालिका आयुक्त डॉ. मतांडा राजा दयानिधी हे आता कोणती योजना बनवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीचे पालिका आयुक्त डॉ सुधाकर देशमुख आणि समीर उन्हाळे हे कोरोना संसर्ग नियंत्रण करू शकले नाहीत त्यामुळे राज्य प्रशासनाने त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आत्ताचे नवे आयुक्त डॉ मतांडा राजा दयानिधी यांच्या समोर कोरोना संसर्गाला शहरातून हद्दपार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात पालिकेत पालिका अधिकाऱ्यांनी बैठक घेतली असून आता त्यांनी आपले कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे. 

उल्हासनगर शहरातील सरकारी कोरोना केअर सेंटर कक्षात 252 रुग्ण, खाजगी कोरोना केअर सेंटर कक्षात 70 रुग्ण, डी सी एच सी मध्ये 121 रुग्ण, डी सी एच मध्ये 70 रुग्ण, होम आय सोलेशन मध्ये 51 तर उल्हासनगर महानगर पालिकेच्या क्षेत्राबाहेरील 46 रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.

27 जून रोजी एकूण 60 कोरोना बाधित झालेले रुग्ण मिळून आले तर 44 व्यक्तींनी कोरोना मुक्त होऊन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत त्यामुळे आतापर्यंत एकूण 874 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी दिली.



                     कॅम्प नंबर 1 मध्ये 09 रुग्ण

                     कॅम्प नंबर 2 मध्ये 13 रुग्ण

                     कॅम्प नंबर 3 मध्ये 07 रुग्ण

                     कॅम्प नंबर 4 मध्ये 21 रुग्ण

                     कॅम्प नंबर 5 मध्ये 10 रुग्ण

                                     एकूण 60 रुग्ण

उल्हासनगर शहरात आतापर्यंत एकूण 874 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत आणि सध्या एकूण 610 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...