Tuesday 30 June 2020

मुरबाड मध्ये कोरोनाचा दुसरा बळी ?कँन्सरग्रस्त रुग्णाचा कोरोनामुळे म्रुत्यु,तालुक्यात 43 कोरोनाग्रस्त,तर आज नव्याने एका रुग्णाची वाढ !!

मुरबाड मध्ये कोरोनाचा दुसरा बळी ?कँन्सरग्रस्त रुग्णाचा कोरोनामुळे म्रुत्यु,तालुक्यात 43 कोरोनाग्रस्त,तर आज नव्याने एका रुग्णाची वाढ !!


मुरबाड ( मंंगल डोंगरे )   एकीकडे मुरबाडमध्ये कोरोनाचा थैमान थांबत नाही, त्यात आज मृतांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.
  मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील ५८ वर्षीय व्यक्ती कॅन्सरवर उपचार घेऊन घरी परतले होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दि. २१ जून रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बदलापूर येथील आशीर्वाद या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्यांच्यावर  उपचार सुरू असतांना काल दुपार पासून त्यांची प्रकृती खालावली. मात्र रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांनी प्राण सोडला.
  
  त्यांचे शव स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेऊन दहन केले. मुरबाड शहरातील हा दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मृत झाल्याची घटना आहे.
   
  दि. २५ जून  रोजी त्यांच्या ५० वर्षीय पत्नीची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सद्या त्यांना ठाणे येथील सेंट मेरी या कोरोन्टाईन सेंटरमध्ये रवाना करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याच कुटुंबातील इतर ५ व्यक्तींचे रिपोर्ट काल निगेटिव्ह आले आहे. तर अद्याप ६ रिपोर्ट बाकी असल्याचे समजते.
[मुरबाड तालुक्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत तालुका आरोग्य अधिका-यांशी संपर्क साधला असता,या वाढत्या रुग्ण संख्येवर तालुक्यात अजूनही कुठलीही ठो, उपाय योजना उपलब्ध नसुन नगरपंचायत व ग्रामपंचायत ने याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लोकांना घरातच रहा, सुरक्षित अंतर ठेवा,स्वतःची काळजी घ्या. अशा सुचना वारंवार देणे गरजेचे असल्याचे सांगितले.]
         मुरबाडच्या बाहेर अद्याप ही उपचाराच्या योग्य सोयीसुविधा नाहीत. करोडपती व्यक्ती पैसे असून ही उपचारापासून वंचित असल्याच्या घटना समजत आहेत.  [ या आजारापेक्षा त्याचा उपचार जीवघेणा असे,  म्हणणे आता चुकीचे ठरणार नाही. कृपया घरातच राहा, सुरक्षित राहा! ]

मृत संख्या = २
 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...