Sunday, 28 June 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषध दुकानांची वेळ मर्यादित - डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषध दुकानांची वेळ मर्यादित - डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

कल्याण   - डोंबिवली शहरात दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. औषधांच्या निमित्ताने नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहे. यावर नियंत्रण यावे तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे या करता औषध दुकानांची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत औषधी दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय 
डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने घेतला आहे .तसेच
 अत्यावश्यक प्रसंगी रुग्णांनी दुकानाबाहेरील क्रमांकावर संपर्क केल्यास औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. एकही रुग्णांला औषधांची कमतरता भासणार नाही असे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे यांनी सांगितले आहे. इमर्जन्सी मध्ये 09702400111 , 09702665111 , 08691091055 या क्रमांक वर संपर्क करावा असे आवाहन डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !! हवामान बदल व त्याचे परिणाम  या विषयावर ...