Wednesday, 28 October 2026

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निवडणुकीत अप्पा शिंदे पॅनेलचा दणदणीत विजय !

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन निवडणुकीत अप्पा शिंदे पॅनेलचा दणदणीत विजय !!

*शिर्डी, २५ ऑक्टोबर २०२६ :* महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार तथा अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.

शिर्डी येथे झालेल्या या निवडणुकीत अप्पा शिंदे यांना 80 टक्क्यांहून अधिक मते मिळाली असून ते अध्यक्षपदी विजयी झाल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे. या विजयामुळे राज्यभरातील केमिस्ट व्यावसायिकांनी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.

या निवडणुकीत अप्पा शिंदे यांच्यासह त्यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

*नवनिर्वाचित पदाधिकारी :*
*अध्यक्ष -* जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे
*उपाध्यक्ष -* रामदास भोसले आणि सुनील भांगळे
*सचिव -* अनिल नावंदर
*कोषाध्यक्ष -* वैजनाथ जागुष्टे
*सहसचिव -* सुनील छाजेड
*संघटन सचिव -* पंकज नानवाणी

राज्यातील औषध विक्रेते आणि केमिस्ट व्यावसायिकांचे प्रश्न सोडवणे, संघटनेची ताकद वाढवणे आणि आरोग्यसेवेतील योगदान अधिक प्रभावी करणे या दृष्टीने नव्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या दणदणीत विजयाबद्दल कल्याणसह राज्यभरातील केमिस्ट व्यावसायिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...