Wednesday, 28 October 2026

एमआयडीसीच्या हक्काच्या पाण्यावर बाहेरील नगरसेवकांचा डल्ला; बूस्टर पंप लावून पाणी पळवले, कर्मचाऱ्यांना मारहाण !!

एमआयडीसीच्या हक्काच्या पाण्यावर बाहेरील नगरसेवकांचा डल्ला; बूस्टर पंप लावून पाणी पळवले, कर्मचाऱ्यांना मारहाण !!

*डोंबिवली, विनोद गिरी :* एमआयडीसी विभागातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असताना आज एमआयडीसीचे अधिकारी श्री. राऊत यांची भेट घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

एमआयडीसी रहिवाशांना सध्या अजिबात पाणी मिळत नसून, आले तरी अत्यंत कमी दाबाने येत असल्याची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

यावर अधिकारी राऊत यांनी धक्कादायक माहिती दिली. बाहेरील विभागातील काही नगरसेवक आपापल्या प्रभागात पाणी वळवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत आहेत. पाहणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि मारहाणही केली जात आहे. तसेच काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बूस्टर पंप लावून हक्काचे पाणी जबरदस्तीने ओढले जात असल्याने जांभूळहून येणाऱ्या पाण्याचा दाब एमआयडीसी विभागापर्यंत पोहोचतच नाही, असे त्यांनी सांगितले.

हा केवळ तांत्रिक बिघाड नसून हक्कावर गदा असल्याचे सांगत, या गंभीर प्रकाराबाबत उद्या महानगरपालिकेचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले. जोपर्यंत एमआयडीसी रहिवाशांना त्यांच्या हक्काचे नियमित पाणी मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, विवेक देशपांडे, अजय घोरपडे, राहुल वाजपेयी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...