५०० रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतच्या पैठणी साड्या उपलब्ध; महिलांसाठी खरेदीची पर्वणी
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण:
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या पारंपरिक आणि आकर्षक पेहरावाच्या खरेदीसाठी विरारमध्ये मनमोहक साड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केशरी पैठणी येवला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन ३० व ३१ ऑक्टोबर तसेच १ नोव्हेंबर दरम्यान बालाजी बँक्वेट्स, विवा वेदगंगा कॉम्प्लेक्सजवळ, गोकुळ टाउनशिप, विरार पश्चिम येथे भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात येवला पैठणी, बनारसी, कांजीवरम, गढवाल, माहेश्वरी, फॅन्सी डिझायनर साड्या अशा विविध प्रकारच्या साड्यांचा आकर्षक संग्रह महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय पैठणी ड्रेस, पर्स आणि इतर विविध वस्तूंचीही खरेदी करता येणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रदर्शनात ५०० रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या पैठणी साड्या उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार साड्यांची निवड करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्च दर्जाच्या पारंपरिक साड्यांची आवड असलेल्या महिलांपर्यंत सर्वांसाठी या प्रदर्शनात खरेदीची संधी उपलब्ध होणार आहे.
दिवाळीच्या सणासाठी पारंपरिक साड्यांसह आधुनिक डिझाइन्सचीही मेजवानी या प्रदर्शनात मिळणार आहे. एकाच छताखाली विविध प्रकारच्या साड्या, आकर्षक रंगसंगती आणि वैविध्यपूर्ण डिझाइन्स उपलब्ध होणार असल्याने विरार आणि परिसरातील महिलांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.
दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आपल्या आवडीच्या साड्यांची निवड करण्यासाठी महिलांनी या विशेष प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment