Wednesday, 28 October 2026

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा !

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा !

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई मध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासक फादर डॉ.अनिल परेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले तसेच ज्ञानार्जनासाठी पुस्तक वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. चांगली पुस्तके माणसाचे जीवन समृद्ध करतात असे ते म्हणाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, उप-प्राचार्या सरिथा कुरियन, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रामदास तोंडे, प्रा. सुजाता कुलकर्णी, डॉ. अजित कुमार यादव आणि प्रा. मॅकॅनोबल , प्रा. अँथनी डिमेलो यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेले ‘ शैक्षणिक वर्षात नव्याने आलेली पुस्तके’ या विषयावरील पुस्तक प्रदर्शन. विविध विषयांवरील नव्याने दाखल झालेल्या पुस्तकांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके पाहून त्यांची माहिती घेतली. 

यावेळी प्राचार्य डॉ. विभुते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची शपथ दिली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी नियमित वाचनामुळे ज्ञान, आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, भाषिक कौशल्य आणि चिकित्सक विचारशक्ती विकसित होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ पुस्तक वाचनासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
वाचन कट्टा मधील विद्यार्थी, ग्रंथालय कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘पुस्तकांशी मैत्री आणि वाचनातून प्रगती’ हा सकारात्मक संदेश रुजविण्यात आला.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, नियमित वाचनाची सवय विकसित करणे तसेच त्यांच्या ज्ञान, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य होता.

No comments:

Post a Comment

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...