*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे : *
*कोपरगाव, दिनांक : ३१ ऑक्टोबर* दिवाळी सणाचे औचित्य साधून आर्या फाऊंडेशन आणि कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीत महिला व पुरुष स्वयंरोजगार मेळाव्याचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून बेरोजगार तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मोठी संधी मिळणार. त्यात पहिल्या दिवशी १७० बेरोजगार तरुण-तरुणींनी उपस्थिती दर्शवली त्यापैकी १६ जणांनी ५१,००० हजार रुपयांची रक्कम भरून स्वतःचा व्यसायाचा शुभारंभ केला.
*मेळाव्याचे वैशिष्ट्य -*
या मेळाव्यात फक्त ५१,००० हजार रुपयांमध्ये टुरिस्ट कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुकांना वाहन खरेदीसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.
- *PMEGP / CMEGP योजनेअंतर्गत ३५% सबसिडी*
महिलांसाठी 'आई योजना' अंतर्गत १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला ०% व्याजदर, १००% रोजगाराची गॅरंटी अधिकृत बँकेकडून कर्ज सहाय्य, हा मेळावा आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ ते उद्या ०१ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे आयोजक शिवसेना शाखा *कोपरगाव चे कार्यसम्राट मा. नगरसेवक, संजय लक्ष्मण पावशे (S.E.O. - उपशहर प्रमुख व सभापती परिवहन समिती क.डो.म.पा.)* आणि *सौ. अपर्णा संजय पावशे (S.E.O. शाखा संघटिका)* आहेत.
स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या महिला व पुरुषांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
*स्थळ: गावदेवी मित्र मंडळ, गावदेवी मैदान, कोपरगाव*
*संपर्क: ७३०४५५७१९१ / ७२६२८५१४५५ / ९८७०३६३८८५*
No comments:
Post a Comment