Saturday, 31 October 2026

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित; मागण्या मान्य !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित; मागण्या मान्य !!

*अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश; १९ प्रकल्पग्रस्तांना टप्प्याटप्प्याने नोकरी देण्याचे आश्वासन*

*उरण, दि. ३१ (विठ्ठल ममताबादे) :* उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक बेरोजगारांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, या मागणीसाठी दि. २९ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू असलेले गेट बंद आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.

दि. ३१ ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. लोकशाही, कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने आक्रमकपणे करण्यात आलेल्या या आंदोलनाला यश आले आहे. कंपनी प्रशासनाने बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

१९ स्थानिक बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांपैकी १० जणांना दोन दिवसांत आणि उर्वरित ९ जणांना पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये कामावर घेण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून जल्लोष करण्यात आला.

मोठेखार (वरचा भाग) प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना, खोपटे-बांधपाडा यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कामावर घेतले नाही, तर पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

*सर्वपक्षीय पाठिंबा*

या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, भाजपा युवा नेते प्रशांत ठाकूर, शिवसेना नेते बी. एन. डाकी, उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, कविता रुपेश पाटील, कामगार नेते रवी घरत, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, महेंद्र पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, सभापती राजेंद्र म्हात्रे, पोलीस पाटील रंगनाथ पाटील, माजी सरपंच विशाखा ठाकूर, प्रीती पाटील, अविनाश ठाकूर, भाजपा नेते किरण म्हात्रे, विश्वास पाटील, उद्योजक देवेंद्र पाटील, बबन ठाकूर, सुधाकर पाटील, संतोष पाटील, अलंकार पाटील, कुमार ठाकूर, हसूराम घरत यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत बांधपाडा (खोपटे) यांचे मोठेखार प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेने आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

सामाजिक, आध्यात्मिक व महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल सौ. प्रभावती मदनराव कुलकर्णी यांना ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान !!!

सामाजिक, आध्यात्मिक व महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल सौ. प्रभावती मदनराव कुलकर्णी यांना ‘नवदुर्गा पुरस्कार – २०२६’ प्रदान !!! ...