Saturday, 24 October 2026

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !!

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !!

*कल्याण (संजय कांबळे) :* पिसे डॅम ते वासुंद्री रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने कल्याण आणि भिवंडी या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग बंद होणार आहे.

भातसा नदीवर पिसे गावात धरण बांधण्यात आले असून, येथून ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. याच पाईपलाईनवरून पिसे ते वासुंद्री अर्थात भिवंडी आणि कल्याण तालुक्यांना जोडणारा रस्ता तयार झाला होता. या रस्त्यामुळे कल्याण ग्रामीण, मुरबाड आणि भिवंडीतील शेकडो तरुण, दूधवाले, भाजीपाला विक्रेते, शेतकरी, कष्टकरी आणि वेअरहाऊस-गोडाऊनमध्ये कामाला जाणाऱ्या नोकरदारांची मोठी सोय झाली होती.

.                सामाजिक कार्यकर्ते किरण केणे

मात्र, या रस्त्याचे काम सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा भाजप नेते कपिल पाटील यांनी एमएसआरडीसी प्रशासनाशी चर्चा करून समृद्धी महामार्गावरील निंबवली टोलनाक्याजवळ एक्झिट सुरू केली आहे. त्यामुळे या मार्गावर तात्पुरता पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे.

या निर्णयामुळे परिसरातील नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची सोय झाल्याने निंबवली गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण केणे यांनी कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !!

पिसे डॅम ते वासुंद्री रस्ता कामामुळे बंद; कपिल पाटील यांच्या पुढाकाराने समृद्धी महामार्गावर एक्झिट सुरू !! *कल्याण (संजय कांबळे)...